Share

‘शिवसेनेने हिंदूत्व सोडलं म्हणून मी शिवसेना सोडतोय’ म्हणत माजी खासदाराने केला भाजपात प्रवेश

हिंगोली मतदार संघाचे व  शिवसेनेचे माजी खासदार अॅड शिवाजी माने यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा मागील अनेक महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. या चर्चेला सोमवारी पुर्ण विराम मिळाला आहे.

शिवाजी माने यांनी शिवसेनेला दुसऱ्यादा जय महाराष्ट्र म्हणत नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे , चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह भाजपच्या बंड्या नेत्यांच्या हस्ते त्यांनी २५ एप्रिल’ला मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात अधिकृतपणे कमळ हाती घेऊन भाजप’मध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे माने हे यापूर्वी भाजपमध्ये होते. त्यांनी सहाव्यांदा पक्ष बदलला असून, भाजपमध्ये दुसऱ्यांदा प्रवेश केला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले,
शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं , महाराष्ट्रातल्या जनतेला त्रास द्यायला सुरवात केली, मुळात शिवसेनेने आता सगळेच मुद्दे सोडलेले आहेत . म्हणून मी शिवसेना सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला . २०१९ च्या सभेमध्ये मला उद्धव ठाकरे यांनी जुलमाचं शिव बंधन बांधलं . मी त्यांना शिव बंधन बांधा म्हणलो नव्हतो …

पुढे ते म्हणाले
‘ येत्या काळात अनेकजण शिवसेना सोडतील ‘ असा शिवसेनेवर आरोप करताना अॅड . शिवाजी माने म्हणाले , ‘ हिंदुत्वासाठी लढणारे आम्ही . त्यावेळेस होतो आमच्या रक्ताने – कष्टाने शिवसेना उभी राहिलेली आहे . मी तर सुरुवात आहे येणाऱ्या काळात अजून कित्येक जण शिवसेना सोडतील . माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने मी शिवसेना सोडली आहे .

आज पर्यंत शिवाजी माने यांनी बदललेले पक्ष
शिवाजी माने हे १९९६ मध्ये शिवसेनेकडून हिंगोली लोकसभा मतदार संघात निवडून आले होते. १९९८ मध्ये परत लोकसभा निवडणूक झाली यामध्ये त्यांचा पराभव झाला. नंतर १९९९ च्या निवडणुकीत ते परत शिवसेने कडून निवडून आले होते. २००४ च्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान शिवाजी माने यांनी कळमनुरी मतदार संघात दोन वेळा विधानसभा निवडणूक लढविली होती.मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर हिंगोली जिल्हा काँग्रेस कमीटीचे ते काही काळ अध्यक्ष देखील होते. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. नंतर भाजपात प्रवेश केला. यानंतर त्यांनी शिवसेनेत परत प्रवेश केला. तर आता पुन्हा एकदा त्यांनी  भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
”शिवसेना वाढवण्यात जे मोजके नेते त्यापैकीच एक राणे होते, तेव्हा राऊत कुठे होते”
हिंगोलीत काँग्रेसला खिंडार, जिल्हाध्यक्षानेच शिवसेनेत केला प्रवेश, समर्थकांनीही भगवा घेतला हाती
औरंगाबादला जाताना छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेणार राज ठाकरे
खूपच हलाखीत काढत होता दिवस, पण ती व्यक्ती आयुष्यात आली अन् बदलले हिटमॅनचे दिवस   

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now