Share

‘आम्ही संकटांचा सामना करत असताना तुम्हाला आता आमची आठवण आली का’? गावकऱ्यांनी आमदाराला खडसावले

jitesha antapurkar

एकीकडे राज्यातील वातावरण हे तापले आहे. राजकीय नेते मंडळी सध्या राज्याच्या राजकारणात व्यस्त आहेत. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. मात्र अजूनही फोडाफोडीचे राजकारण सुरूच आहे. शिवसेनेला लागलेली गळती काही केल्या थांबण्याच नाव घेत नाहीये.

तर दुसरीकडे काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे.  या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतातील पिकाचे मोठे नुकसान झालं आहे. याचबरोबर पुणे -पानशेत रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली.

याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूर आल्यानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच शेतीला देखील मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर नेते मंडळी आता राज्यात दौरे करत आहेत. नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत आहेत.

मात्र पाहणी करायला गेलेल्या एका आमदाराला संतप्त शेतकऱ्यांनी चांगलच धारेवर घेतलं आहे.  नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने नुकसान झाली आहे. याचबरोबर पाहणी करण्यासाठी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर गेले होते.

मात्र पाहणी करायला गेलेल्या जितेश अंतापुरकर यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. ‘आम्ही संकटांचा सामना करत असताना तुम्हाला आता आमची आठवण आली का’? असा संतप्त सवाल करत गावकऱ्यांनी अंतापुरकर यांना चांगलेच खडसावले.

सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार सुरू करताच आमदारांनी तेथून पळ काढला असल्याच व्हिडीओमध्ये कैद झाल आहे. यावेळी बोलताना गावकऱ्यांनी अनेक आरोप केले. गरज असल्यावर फोन केला मात्र अंतापुरकर यांनी फोन उचलला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या
हातातले शिवबंधन सरणावर गेल्यावरच सुटेल; पक्ष सोडतानाही शिवसेना नेत्याची भावूक प्रतिक्रिया
तुमच्या ‘या’ सवयींमुळे वयाच्या आधीच तुम्ही दिसू शकता म्हातारे; वाचा त्यावरील उपाय …
शाहरूख आणि काजोलबद्दल उडाली ‘ही’ अफवा, ऐकल्यावर अजय देवगणलाही लागेल मिर्ची
सोशल मीडियाचा वापर करत ‘या’ चार तरुणांनी उलथवून टाकली श्रीलंकेतील राजपक्षे कुटुंबाची सत्ता

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now