शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर शिंदे गटाला पाठिंबा देणारे जिल्हाप्रमुख झाले फरार
शिंदे गटाला पाठिंबा देणे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना पडले महागात, शिवसैनिकांनी शिकवला धडा
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलेले आहे. त्यांनी आतापर्यंत ४० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. त्यामध्ये अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. यानंतर महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
यामध्ये एकनाथ शिंदेंला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये काही शिवसेनेच्या जिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. यामध्ये बंड केलेल्या आमदार मंजुळा गावित यांचे पती जिल्हाध्यक्ष असल्याने तेही शिंदे गटात गेले आहेत. पण त्यांचे कार्यकर्ते मात्र शिवसेनेतच आहेत त्यामुळे त्यांच्यासमोर दुविधा निर्माण झाली आहे.
त्यांना बॅनर लावणेही अवघड झाले आहे. शिवसेना नेत्यांनी त्यांच्याविरोधात घोषणा देण्यास सुरूवात केली आहे आणि त्यांचा निषेध करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गट. त्याचे तीव्र पडसाद पुर्ण राज्यात उमटत आहेत.
शिंदे यांच्या समर्थनार्थ महानगरप्रमुख सतीश महाले यांनी पुर्ण शहरात बॅनर लावले होते पण संतप्त शिवसैनिकांनी ते बॅनर फाडून टाकले. तसेच जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित हे आमदार मंजुळा गावित यांच्यासह शिंदे गटात गेलेत त्यामुळे त्यांच्यावरही शिवसैनिक भडकले आहेत.
ज्या ज्या जिल्हाप्रमुखांनी एकनाथ शिंदेना पाठिंबा दिला होता त्यांच्यावर शिवसैनिक भडकले आहेत. महानगरप्रमुख, जिल्हाप्रमुखांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली असताना ठाकरे यांना पाठिंबा देम्यासाठी शिंदखेडा आणि शिरपूर विभागाचे सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी शक्तीप्रदर्शन करत भक्तीयात्रा काढली. पण ही यात्रा कोणाचीही परवानगी न घेता काढण्यात आली होती.
याबाबत वरिष्ठांना काहीही माहिती नव्हते. धुळे व साक्री विभागाचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री यांनी सांगितल्यानंतर गोंधळ निर्माण झाला. या सर्व गोंधळात पक्षात फुट पडली आहे. सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी म्हणाले की, शिवसेनेला बंडाची स्थिती काही नवीन नाही.
अशी कितीही वादळे आली गेली तरी शिवसेना आणि ठाकरे हेच एक वादळ आहे. महानगरप्रमुख आणि जिल्हाप्रमुख हे बंडखोर शिंदे गटात सामिल झाल्याने शिवसेनेचे काहीही बिघडणार नाही. फरार जिल्हाप्रमुख आणि महानगरप्रमुखांची राजकीय पातळीवर राखरांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
सलमानच्या विरोधात बोलल्यानंतर ‘या’ गायिकेला आल्या होत्या बलात्काराच्या धमक्या, वाचून धक्का बसेल
“शरद पवार गोड बोलून काटा काढतात”, बंडखोर शिवसेना आमदारची ऑडिओ क्लिप व्हायरल
बंडाच्या पाचव्या दिवशी एकनाथ शिंदे आपल्या ‘त्या’ विधानावरून पलटले; सारवासारव करत म्हणाले..
आमदार फोडण्यासाठी ५० कोटींची ऑफर दिली’; शिवसेना आमदाराचा खळबळजनक दावा