मध्यप्रदेशात नुकतीच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये जनतेतून नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला. उलट काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप सत्ताधारी पक्ष असून सुद्धा त्यांचे ७ महानगरपालिकांवर नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. (The decision of electing the mayor directly from the people was faced by the BJP)
शिवेंद्रसिंग चौहान सरकारने जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला होता. मात्र १६ महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये हेच स्पष्ट होते की, शिवेंद्रसिंग चौहान सरकारला त्यांचा हाच निर्णय महागात पडला आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता नव्हती, अशा ५ नगरपालिकांवर काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
मध्यप्रदेशमध्ये झालेल्या १६ महानगरपालिकेंच्या निवडणुकांमध्ये ९ भाजपचे, ५ काँग्रेसचे, १ अपक्ष आणि १ आम आदमी पार्टीचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. भाजपचा मध्यप्रदेशमध्ये थेट लोकांतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय भाजपा ऐवजी काँग्रेसलाच फायदेशीर ठरला आहे.
कमलनाथ सरकारचा निर्णय बदलणे भाजपला अंगलट आल्याचे दिसते आहे. कमलनाथ सरकारचा निर्णय बदलल्यामुळे ७ महानगरपालिकांवर असणारी सत्ता भाजपला गमवावी लागली आहे.
काँग्रेसचा निर्णय बदलला नसता तर १६ पैकी १५ महानगरपालिकांवर भाजपची सत्ता कायम राहिली असती. जनतेतून नगराध्यक्ष थेट निवडण्याचा निर्णय २०२० ला आलेल्या भाजपच्या शिवेंद्रसिंग चौहान सरकारने घेतला.
परंतु या निर्णयामुळे रीवा, कटना, ग्वाल्हेर, सिंगरौली, मैरना, जबलपूर, छिंदवाडा या नगरपालिकांमधील सत्ता गमवण्याची वेळ भाजपवर आली. उलट ५ नगरपालिकांवर काँग्रेसला विजय मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
अनेक वर्षांची भाजपची सत्ता उलथवत काॅंग्रेसचा दणदणीत विजय; ७ महापालिका घेतल्या ताब्यात
Savitri Jindal: २ वर्षात १ लाख कोटी कमावणाऱ्या सावित्री जिंदाल काय करतात? वाचा देशातील सर्वात श्रीमंत महिलेबद्दल..
मी टू मुव्हमेंटमुळे चर्चेत आलेल्या या अभिनेत्रीचे पुन्हा गंभीर आरोप; म्हणाली, मी आत्महत्या करणार….