Share

अभिषेक-ऐश्वर्याच्या अवघ्या ११ वर्षीय मुलीची कोर्टात धाव; आराध्या बच्चनसोबत नेमकं काय घडलं?

बाॅलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांची नात आणि अभिषेक आणि ऐश्वर्या (Aishwarya Rai) यांची मुलगी आराध्या बच्चन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. स्टारकिट्स आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) ही अनेकदा ट्रेलरच्या निशाणावर असते. आराध्या विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे.

आराध्या विषयी काही माध्यमांनी अफवा पसरवल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणी बच्चन कुटुंबियांनी आपल्या लेकीसाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. आराध्याच्या तब्येतीबाबत खोटी माहिती दिल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयात २ यूट्यूब चॅनल आणि एका वेबसाइटविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणी दिल्लीत उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. त्यावेळी सांगण्यात आले की, प्रत्येक मुलाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, मग ते सेलिब्रिटीचे मूल असो किंवा सामान्य माणसाचे. विशेषत: शारिरीक आणि मानसिक आरोग्याबाबत बालकांना दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणे कायद्याने पूर्णपणे गुन्हा आहे.

तु्म्ही अपलोड केलेल्या व्हिडिओमधून जास्तीत जास्त नफा घेत नाही आहात का? अशा अनेक प्रश्नांची सरबत न्यायालयाने केली. अशी कोणतीही माहिती लोकांपर्यंत पोहोचू नये, ज्यामुळे एखाद्याची प्रतिमा खराब होऊ शकते, असा इशारा कोर्टाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दिला आहे. तसेच याप्रकरणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समन्स देखील जारी केले आहेत. कोर्टाने गुगल आणि यूट्यूब चॅनलला समन्स बजावले.

त्यानंतर यूट्यूब व्हिडिओवर आक्षेप घेत न्यायालयाने सांगितले की, प्रत्येक मुलाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अशा खोट्या बातम्यांना आळा घालणे ही व्यासपीठाची जबाबदारी आहे. तसेच, आराध्या बच्चनच्या प्रकृतीबाबत खोट्या बातम्या पसरवणारे सर्व व्हिडिओ आणि तात्काळ हटवावेत, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी यूट्यूबवर चालणाऱ्या विविध संस्थांना दिले आहेत.

दरम्यान, आराध्याबाबतच्या या फेक न्यूजनंतर आता बच्चन कुटुंब चांगलेच संतापले आहे. पण अद्यापही बच्चन कुटुंबीयांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये. आराध्या ११ वर्षाची आहे. ती मुंबईतील धीरूभाई अंबानी या शाळेतील सहावीच्या वर्गात शिकवत आहे.

महत्वाच्या बातम्या
गायक अदनान सामीने दुसऱ्या बायकोसोबत पाॅर्न व्हिडीओ बनवले आहेत, सगळे पाहू शकतात..
खारघर उष्माघात प्रकरणातील मृतांचा पोस्टमाॅर्टममधून धक्कादायक खुलासे; डॉक्टर म्हणाले, “त्यांच्या शरीरात…
राज्यात लवकरच राजकीय भूकंप! ३५ वर्षे आमदार असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान, राजकीय वर्तुळात खळबळ

 

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now