Share

महाविकास आघाडीला ‘महा’झटका : अनिल देशमुख, नवाब मलिकांना विधानपरिषदेसाठी मतदान करता येणार नाही

anil

आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला जबर धक्का बसला आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना मतदानाची परवानगी देण्यास हायकोर्टाने नकार दिला. यामुळे आता ठाकरे सरकारवर पुढे नवं आव्हान आलं आहे.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठीची निवडणूकही तोंडावर आली असल्याने सर्वपक्षीय नेते मंडळींची खलबते सुरू आहेत. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला निवडणूक होणार आहे. त्यासाठी ९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे; तर, १० तारखेला राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे.

त्यामुळे  विधान परिषदेसाठीही खलबते सुरू आहेत. मात्र अशातच महाविकासआघाडी सरकारला मुंबई उच्च न्यायालयाकडून दणका मिळाला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदानासाठी काही तास विधानभवनात जाऊ देण्याची परवानगी मागितली होती.

मात्र विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करू देण्याची अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. गुरुवारी न्यायमूर्ती निझामुद्दीन जमादार यांच्यासमोर यावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आज हायकोर्टाने आपला निकाल जाहीर केला.

राज्यसभा निवडणुकीत देखील अनिल देशमुख, नवाब मलिकांना मतदान करता आले नव्हते.  राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी एक दिवसाची परवानगी मिळावी, यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याकडून अर्ज करण्यात आला होता.

मात्र मुंबईतील विशेष न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले होते. दरम्यान, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाने फेब्रुवारीमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. तर अनिल देशमुख देखील मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत.

सिम्बा भारतीय बाजारपेठेत दाखल होऊन काही वर्षेच झाली आहेत. ८ टक्के अल्कोहोल सामग्री असलेली ही प्रीमियम बिअर आहे. हळुहळु ती बाजारपेठेत वेगळी ओळख निर्माण करत आहे. ‘आतल्या हिरोला जागे करा आणि तुमचा खरा दम दाखवा’! ही बिअर नावाप्रमाणेच कामातही उत्तम आहे. ८ टक्के अल्कोहोल सामग्रीसह, ही बिअर प्रथमच पिणारे बेधुंद होऊन जातात.

महत्वाच्या बातम्या
उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला आणि गोळीबार; अग्नीपथ योजनेविरोधातील आंदोलन पेटले
‘राष्ट्रपती पदासाठी उंची आणि बौद्धिक पातळी आवश्यक आहे’, सदावर्तेंचा शरद पवारांना टोला
अजय देवगण सोबत झळकलेल्या अभिनेत्रीवर आली भयंकर वाईट वेळ, चेहऱ्यातून काढल्या होत्या ६७ काचा

क्राईम इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now