Share

BJP: मुस्लिम लक्ष्मीची पूजा करत नाहीत तरी ते कोट्याधीश कसे? भाजप नेत्याने उडवली हिंदूंच्या श्रद्धेची खिल्ली

BJP: बिहारमध्ये आतापर्यंत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये समोर आली आहेत, मात्र यावेळी भारतीय जनता पक्षाचे आमदार लालन पासवान यांनी असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. भाजप आमदार लालन पासवान यांनी हिंदूंच्या श्रद्धांवर प्रश्न उपस्थित केला आहे. भागलपूरच्या पीरपेंटी येथील भाजप आमदार लालन पासवान यांनी एका संवाद कार्यक्रमादरम्यान दिवाळीतील लक्ष्मी पूजनावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामागे त्यांनी आपले तर्कही मांडले आहेत. BJP, Lalan Paswan, Lakshmi Pujan, Hindu, Muslim

आमदार लालन पासवान म्हणाले की, मुस्लिम लक्ष्मीची पूजा करत नाहीत, म्हणून ते श्रीमंत होत नाहीत का? ते पुढे म्हणाले की, मानलं तर तो देव आहे आणि नाही मानल तर दगड. जोपर्यंत तुम्ही यावर विश्वास ठेवता, तोपर्यंत आत्मा आणि परमात्मा यांचा संबंध आहे. जर तुम्ही विश्वास ठेवणे थांबवले तर तुमची बौद्धिक क्षमता वाढेल.

लालन पासवान पुढे म्हणाले, मानण्याऐवजी जेव्हा आपण आपल्या तर्कशक्तीशी जोडले जातो आणि जेव्हा त्यांची विचारसरणी वैज्ञानिक होते आणि तेव्हा सर्वजण आपल्यासारखेच बदलतील. अशाप्रकारे आमदार लालन कुमार यांनीही देवी-देवतांच्या पूजेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

लालन पासवान म्हणाले की, सरस्वती ही विद्येची देवी आहे असे मानले जाते, पण जर मुस्लिम सरस्वतीची पूजा करत नाहीत, तर ते विद्वान नाहीत का, ते आयएएस-आयपीएस अधिकारी नाहीत का? ते पुढे म्हणाले की, लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे, अशीही एक धारणा आहे. दीपावलीमध्ये हिंदू लोक लक्ष्मीची पूजा करतात कारण त्यांना पैसा मिळेल.

ते पुढे म्हणाले की, मुस्लिम लक्ष्मीची पूजा करत नाहीत, मुस्लिम अब्जाधीश आणि कोट्यधीश नाहीत का? भाजप आमदार एवढ्यावरच न थांबता म्हणाले की, हिंदू धर्मात अशीही श्रद्धा आहे की बजरंगबली ही शक्ती असलेली देवता आहे, तो शक्ती देतो. ते म्हणाले की जर ख्रिश्चन आणि मुस्लिम बजरंगबलीची पूजा करत नाहीत तर त्यांच्यात ताकद नाही का?

असे प्रश्न उपस्थित करत लालन पासवान पुढे म्हणाले, जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवत आहात, तोपर्यंत सर्वकाही आहे. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवण बंद कराल तेव्हा सर्व काही संपलेल असेल. ते म्हणाले की, लोकांची विचारसरणी जसजशी नैसर्गिक, वैज्ञानिक आणि सामाजिक होत जाईल, तसतसे हे सर्व रोग संपतील.

महत्वाच्या बातम्या-
BJP : आली रे आली भाजपची बारी आली! आजवर शिवसेना फोडणाऱ्या भाजपचा माजी मंत्रीच ठाकरेंनी फोडला
bachchu kadu : शिंदे-भाजप सरकारमध्ये पडली मोठी फुट? दोन्ही मित्रपक्षांचे एकमेकांवर गंभीर आरोप, म्हणाले फक्त पैशासाठी…
Prashant Kishor : नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत सत्ता स्थापन करणार; प्रशांत किशोर यांचा धक्कादायक गौप्यस्फोट

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now