Share

‘गदर’च्या तारा सिंहच्या सकीना मॅडमवर फसवणुकीचा आरोप; अभिनेत्री म्हणाली, माझ्या जीवाला धोका…

सनी देओलच्या (Sunny Deol) ‘गदर’ चित्रपटात सकीना मॅडमची भूमिका करणारी अभिनेत्री अमीषा पटेल (Amisha Patel) लवकरच ‘गदर 2’मध्ये पुन्हा एकदा दिसणार आहे, ज्यासाठी ती सध्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, तिच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे, जी धक्कादायक आहे. अमिषा पटेलवर फसवणुकीचा आरोप करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.(The actress said, my life is in danger )

होय, हे प्रकरण मध्य प्रदेशचे आहे, जिथे तिला एका कार्यक्रमाला जायचे होते. अमिषावर एका सामाजिक कार्यकर्त्याने फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. अमीषा पटेलवर आरोप आहे की, ‘तिने कार्यक्रमाला येण्यासाठी खूप मोठी फी घेतली, पण ती कार्यक्रमात फक्त 3 मिनिटे थांबली आणि परत गेली’.

या प्रकरणी स्वत:चा बचाव करताना अमिषाने सांगितले की, ‘त्या कार्यक्रमात तिच्या जीवाला धोका होता आणि आयोजकांनी अतिशय वाईट पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला होता’. इतकंच नाही तर अमिषा पटेलने तिच्या ट्विटर हँडलवर या प्रकरणाबद्दल लिहिलं आहे. तिने लिहिले की, ते 23 एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील खांडवा शहरात नवचंडी महोत्सव 2022 मध्ये सहभागी झाले होते, परंतु स्टार फ्लॅश एंटरटेनमेंट आणि अरविंद पांडे यांनी कार्यक्रमाचे योग्य आयोजन केले नाही’.

तसेच, अभिनेत्रीने पुढे लिहिले आहे की, ‘माझी चांगली काळजी घेतल्याबद्दल मला स्थानिक पोलिसांचे आभार मानायचे आहेत’. या कार्यक्रमात अमिषाने आपल्या जीवाला धोका असल्याचेही सांगितले होते. याआधीही अमिषा पटेल कायदेशीर अडचणीत सापडली आहे. याआधीही 32 लाखांचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी कोर्टाने तिच्यावर वॉरंट बजावले होते.

याशिवाय, अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे सुंदर फोटो-व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते तिला फॉलो करतात. याशिवाय तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती बर्‍याच दिवसांपासून फिल्मी जगापासून दूर होती, मात्र ती ‘गदर 2’मधून पुन्हा एकदा कमबॅक करत आहे.

महत्वाच्या बातम्या-
खेसारीलालने मिठी मारताच ढसाढसा रडू लागली अभिनेत्री, वाचा शुटींगदरम्यान नक्की काय घडलं?
भारताला प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसला, मिसाइल टेस्टिंगदरम्यान घडलं असं काही की. .
OMG: शुटिंग सुरू होताच लीक झाली सनी देओलच्या गदर २ ची कहानी, असा असेल चित्रपट
अभिनेता विजय बाबूवर महिलेने केला बलात्काराचा आरोप; गुंगीच्या गोळ्या देऊन…

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now