Homeताज्या बातम्याOMG: शुटिंग सुरू होताच लीक झाली सनी देओलच्या गदर २ ची कहानी,...

OMG: शुटिंग सुरू होताच लीक झाली सनी देओलच्या गदर २ ची कहानी, ‘असा’ असेल चित्रपट

बॉलीवूड दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी त्यांच्या आगामी ‘गदर 2’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे, ज्यामध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल सारखे फेमस स्टार्स दिसणार आहेत. गदरमध्ये दिसलेला उत्कर्ष शर्माही सनी देओलसोबत गदर 2 चित्रपटात दिसणार आहे. गदर चित्रपटात सनी देओल पत्नीसाठी पाकिस्तानात गेला आणि बॉक्स ऑफिस हादरून टाकल.

गदर 2 चित्रपटात सनी देओल पुन्हा पाकिस्तानात जाणार आहे पण यावेळी तो आणखी एका कारणामुळे सीमा ओलांडणार आहे. ताज्या रिपोर्टनुसार, गदर 2 चित्रपटाची कथा 1970 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाभोवती फिरताना दिसणार आहे. उत्कर्ष शर्मा या चित्रपटात एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्याच्या आयुष्यासाठी सनी देओल पाकिस्तानात प्रवेश करणार आहे.

चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने माहिती दिली की, गदरमध्ये तारा आणि सकिना यांची प्रेमकथा प्रेक्षकांना दाखवण्यात आली. भारत-पाकिस्तानच्या फाळणीभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाची कथा अनिल शर्मा यांनी सुंदर प्रेमकथेत बदलली ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

गदर 2 मध्ये अनिल शर्मा 1971 चे भारत-पाकिस्तान युद्ध सादर करणार आहेत. यामध्ये उत्कर्ष शर्मा एका भारतीय सैनिकाची भूमिका साकारणार आहे. या लढ्यादरम्यान तारा सिंगच्या मुलाच्या जीवावर बेतेल, त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी तो पाकिस्तानला जाईल. गदर 2 चित्रपटाच्या कथेवरून असे दिसते की अनिल शर्मा पिता-पुत्राचे नाते मोठ्या पडद्यावर दाखवण्याच्या मूडमध्ये आहे.

बाप-मुलाच्या नात्यातील प्रेम त्यांनी ‘अपने’ या चित्रपटात दाखवले होते, जो चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. तोच फॉर्म्युला तो पुन्हा एकदा आजमावणार आहे. अनिल शर्मा यावेळी यशस्वी होतील की नाही हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहे.

महत्वाच्या बातम्या :-
बुली बाई ऍप: नेपाळी युवकाचे मुंबई पोलिसांना खुल्ले आव्हान, म्हणाला, हिम्मत असेल तर अटक करून दाखवा
पंजाबमधील रॅलीपेक्षा पीएम मोदींच्या पुनरागमनाचा भाजपला अधिक फायदा होईल का? जाणून घ्या
‘’कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्या पाहिल्यानंतर मोदींनी आपली नौटंकी सुरू केली, ते दिल्लीला परतले’’