जसं राज्यात शिंदे सरकार स्थापन झालं तसं ‘रिक्षावाला’ हा शब्द प्रचंड गाजतोय. राज्यात गेल्या दहा दिवसात घडलेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण बदलले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत मोठी फूट पाडली आणि 40 हून अधिक आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली.
काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘रिक्षावाला’ असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. ‘काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती, त्याला ब्रेकच लागत नव्हता’, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले होते. ‘रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. यामुळे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा वाद रंगला आहे. तर आता मनसेने शिवसेनेला जबर धक्का दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या संघटनेमधील तब्बल १२० रिक्षाचालकांनी मनसेच्या संघटनेत प्रवेश केला. यामुळे शिवसेना मोठा धक्का बसला आहे. नुकतच मनसे पदाधिकारी प्रदीप चौधरी यांच्या प्रयत्नातून ठाकुर्ली रेल्वे स्थानक शेजारील रिक्षा स्टँडचे नूतनीकरण करण्यात आले.
यावेळी मनसेचे अनेक नेते मंडळी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितलं आहे की, १२० रिक्षाचालक गेले ३० वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून या रिक्षा संघटनेत कार्यरत होते. आज हे सर्व राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेत सामील झाले आहेत.’
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील शिंदे समर्थक रिक्षाचालकांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून पोस्टर लावले होते. ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर शिंदे समर्थक रिक्षाचालकांकडून हे पोस्टर लावण्यात आले होते. ‘होय, आम्हाला अभिमान आहे..आमचा रिक्षाचालक मुख्यमंत्री झाला’, असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या :-
शिवसेनेला भलं मोठं भगदाड! अनेक पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे; शिंदे गटाला दिला जाहीर पाठिंबा
शिवसेनेची गळती काय थांबेना, आता ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा, शिंदे गटात सामील होणार?
शिवसेनेने आढळराव पाटलांना दिली ‘या’ मतदारसंघातून लढण्याची ऑफर, पण पाटील म्हणाले, मला..