bjp : राज्याच्या राजकारणात कधी, काय होईल सांगता येतं नाही. निवडणुका आल्या की, समीकरण बदलताना पाहायला मिळतात. सध्या राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. ठाकरे गटसह राष्ट्रवादी – कॉंग्रेस आणि कॉंग्रेस विरोधी बाकावर बसले आहेत. यामुळे सध्या राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे.
असं असलं तरी देखील आज १०७९ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत एकूण ७४ टक्के मतदान झालं होतं. या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा समोर आला आहे. भाजपा आणि शिंदे गट अशा एकूण ३५२ ठिकाणी विजय मिळाला, तर मविआने ४५१ ठिकाणी विजय मिळवला.
मात्र नंदुरबारमध्ये चित्र काहीस वेगळं पाहायला मिळालं. नंदूरबार जिल्हा परिषदेत वेगळच राजकारण पाहायला मिळालं. ठाकरे गटाने चक्क भाजपला पाठिंबा दिला. यामुळे शिंदे गटाला जबर धक्का बसला. नंदुरबारमधील हे राजकीय समीकरण पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नंदूरबार जिल्हा परिषदेत भाजपचे नेते आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषदेच अध्यक्षपद स्विकारल आहे. तर काँग्रेसमधून फुटून गेलेले सदस्य सुहास नाईक यांनी उपाध्यक्ष स्वीकारलं आहे. तसेच आज झालेल्या निवडणुकांमध्ये दोघांनाही ३१ मते मिळाली.
तर हाती आलेल्या महितीनुसार, २५ मते विरोधी पक्षाच्या उमेदवारांना मिळाली आहेत. तर नंदुरबारच्या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे २४ सदस्य आहेत. तर भाजपचे सदस्य २० इतकी आहे. मात्र उद्धव ठाकरे गटातील सदस्यांनी आणि काँग्रेसच्या ५ सदस्यांनी भाजपच्या बाजूनं मतदान केलं.
महत्वाच्या बातम्या-
devendra fadanvis : फडणवीसांच्या खेळीमुळे आशिष शेलारांचा झाला गेम, भाजपने माघार घेतल्यामुळे पडले तोंडघशी
Sanjay Raut : माघार घेतली नसती तरी आम्ही जिंकलोच असतो, राऊतांनी थेट तुरूंगातून सांगीतला मताधिक्याचा आकडा
Shakti Kapoor : अभिनेत्रीचे शक्ती कपूरवर गंभीर आरोप, म्हणाली, बोल्ड सीन करताना तो एवढा उत्तेजीत झालता कि….