शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद संपायचे नाव घेत नाहीये. हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे हे सर्वांना माहिती आहे. तारीख पे तारीख दिली जात आहे पण यातून काही तोडगा निघत नसल्याचे चित्र आहे. कधी ठाकरे गट वरचढ ठरतोय तर कधी शिंदे गट वरचढ ठरतोय.
यादरम्यान ठाकरे गटाने पुन्हा एक मोठी खेळी खेळली आहे. ठाकरे गटाने मागणी केली आहे की, हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवण्यात यावे. या मागणीचा संबंध थेट निवडणुकीशी आहे. आगामी मुंबई महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीसाठी ठाकरेंनी मोठा डाव टाकल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शिंदे गटाचे टेंशन वाढण्याची शक्यता आहे.
शिवसेना कोणाची हा लढा न्यायालयात सुरू असताना ही मागणी करण्यामागे ठाकरे गटाचा काय प्लॅन आहे हे समजून घेऊया. या मागणीमुळे शिंदे गटाची डोकेदुखी वाढू शकते. या वर्षी तरी याचा निकाल लागेल अशी सगळ्यांची अपेक्षा होती पण न्यायालय यावर निकाल द्यायला तयार नाही.
ही सुनावणी खंडपिठाने १४ फेब्रुवारीपर्यंत पुढं ढकलली आहे. महाराष्ट्रात जेव्हापासून शिवसेनेतील काही नेत्यांनी बंडखोरी केली तेव्हापासून हा सत्तासंघर्ष सुरू आहे. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. भाजप आणि शिंदे गटाने मिळून नवीन सरकार स्थापन केलं.
त्यानंतर हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या या मागणीने शिंदे गटाला घाम फुटण्याची शक्यता आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जावे अशी मोठी मागणी ठाकरे गटाने केल्याने शिंदे गटात खळबळ माजली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून शिंदे गटाच्या नेत्यांवर पन्नास खोके एकदम ओके असा आरोप होत आहे. त्यांना गद्दार ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. भाषणांमधून, सभांमधून हे खोके सरकार आहे अशी प्रतिमा निर्माण केली जात आहे. शिंदेंच्या माथ्यावर गद्दारीचा शिक्का मारण्याचे शर्तीचे प्रयत्न ठाकरे गटाचे सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या
Omkar bhojane : हास्यजत्रा का सोडली? अखेर ओंकार भोजनेने सोडले मौन; सांगितले ‘हे’ वेगळेच कारण
सल्ला ऐकला ते झाले मालामाल; १० हजाराचे झाले १५ कोटी, वाचा कशी झाली ही कमाल
आऊट झाल्यानंतर शुबमन गिल का चिडला रोहितवर? शिवीगाळ करत ड्रेसिंग रूममध्ये परतला
स्टाॅक नाही हा तर कुबेराचा खजिना! १० हजाराचे झाले १५ कोटी; एका झटक्यात झाले मालामाल