Share Market: स्टॉक मार्केटमध्ये असे काही स्टॉक्स आहेत जे त्यांच्या गुंतवणूकदारांना कमी कालावधीत श्रीमंत करतात. असाच एक स्टॉक आहे ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या शेअरचे नाव इन्फोसिस (Infosys) आहे.
इन्फोसिसचा IPO 29 वर्षांपूर्वी आला होता. इन्फोसिसचे शेअर्स इश्यू किमतीच्या 52 टक्के प्रीमियमवर लिस्ट केले गेले. त्या काळात गुंतवणूकदारांनी भरघोस नफा कमावला होता. त्यावेळी इन्फोसिसच्या शेअरची इश्यू किंमत सुमारे 95 रुपये होती.
त्याच वेळी, इन्फोसिसच्या शेअरची किंमत 1,510 रुपये पर्यंत वाढली आहे. ज्यांनी यात गुंतवणूक केली त्यांना बंपर नफा झाला. माध्यमातील वृत्तानुसार, लिस्टिंग झाल्यापासून इन्फोसिसने आठ वेळा बोनस जारी केला आहे.
इन्फोसिसमधील गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. जर कोणी इन्फोसिस IPO मध्ये 9 हजार 500 रुपये गुंतवले असतील तर त्याला 100 शेअर्स मिळाले असते. कंपनीने आठ वेळा बोनस शेअर्स जारी केला आहे. तर एकदा कंपनीने स्टॉक विभाजित केला.
या प्रकरणात शेअर्सची संख्या 1लाख 2हजार 400 झाली असती. जर आपण सध्या इन्फोसिसच्या शेअर्सवर नजर टाकली तर सोमवारी म्हणजेच 9 जानेवारी 2023 रोजी त्याची किंमत 1 हजार 485च्या आसपास चालू आहेत. या प्रकरणात, 1लाख 2 हजार 400 शेअर्सची किंमत सुमारे 152,064,000 रुपये आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले .
दरम्यान, इन्फोसिसचे नाव नामांकित कंपन्यांच्या यादीत आहे. कंपनीची स्थापना 1981 मध्ये झाली. Infosys Consultants Pvt Ltd ची स्थापना पुण्यातील सात अभियंत्यांनी केली. कंपनीत सध्या तीन लाखांहून अधिक लोक काम करत आहेत. इन्फोसिसने या काळात आठ लाख कोटी रुपयांचे मूल्यांकन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
राजकारण संपल्यात जमा होतं पण फडणवीसांना सेटींग लावली अन् नशीबच फळफळलं, थेट केंद्रात मंत्रीपद मिळालं
योगेश कदम यांचा अपघात की घातपात? पोलिसांनी पकडताच ट्रक चालकाने दिली कबुली, म्हणाला…