यंदा १७ मार्च आणि १८ मार्चला होळी साजरी केली जात आहे. मराठी दिनदर्शिकेनुसार होळी हा वर्षातील शेवटचा आणि सर्वात मोठा सण आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात होळी साजरी केली जाते. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन साजरे केले जाणार आहे तर धुलीवंदन दुसऱ्या दिवशी साजरे केले जाते. (thackeray government on holi guidelines)
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना व्हायरसमुळे होळीचा सण चांगला साजरा होत नव्हता. पण, यंदा होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे. असे असताना आता राज्य सरकारने होलिका दहन आणि धुलिवंदनासाठी नवीन नियम जाहीर केले आहेत.
यंदाचे होलिका दहन १७ मार्चला आहे आणि धुलिवंदन १८ मार्च रोजी आहे. त्यानिमित्ताने राज्य सरकारने नवीन नियम जाहीर केले आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात येत आहे. या नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा आदेश गृह मंत्रालयाने जारी केला आहे.
अजूनही कोरोनाचा पूर्णपणे नायनाट झालेला नाही, त्यामुळे मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळले पाहिजे. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, यावेळी होलिका दहन आणि धुलिवंदनाच्या मुहूर्तावर गृह विभागाने नवे नियम जारी केले आहेत.
होलिका दहन, धुलिवंदनासाठी राज्य सरकारचे नवे नियम
• सध्या राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे लाऊडस्पीकर मोठ्या आवाजात वापरू नयेत.
• सर्व विभागीय पदाधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे बंधनकारक असेल. रात्री १० वाजण्यापूर्वी होळी करणे बंधनकारक असेल.
• होळीच्या दिवशी झाडे तोडू नका. असे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
• सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होळीच्या काळात डीजेला परवानगी नाही. डीजे वापरताना कोणी आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
• सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. होळी साजरी करताना मद्यधुंद अवस्थेत वर्तन करू नये, हे लक्षात ठेवले पाहिजे. होळीनिमित्त जमणाऱ्या महिला व मुलींना कोणीही त्रास देणार नाही. हे मंडळाच्या अध्यक्षाने व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे. याला ते सर्वस्वी जबाबदार असतील.
• महिलांनी परिधान केलेले दागिने आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
• होळीच्या कार्यक्रमात कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा घोषणा देऊ नका. तसेच, आक्षेपार्ह होर्डिंग्ज/बॅनर्स लावू नयेत.
• होळी किंवा धुलिवंदनाच्या निमित्ताने रंग, फुगे आणि पाण्याच्या पिशव्या कोणावरही जबरदस्तीने फेकू नयेत.
महत्वाच्या बातम्या-
आता भाजप नेत्यांना महाविकास आघाडीचे झटक्यावर झटके; माजी मंत्र्यावर टाकला फासा
नोकरी आणि लग्नाच्या अमिषापोटी ज्ञानेश्वर झाला शहजाद, केलं दोनदा धर्मांतर; बीडमधील घटना चर्चेत
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटात बिट्टा साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरचे चाहत्यांनी केलं कौतुक; म्हणाले..