शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी दिवसभर ते गुजरातला होते. त्यानंतर ते आसामला रवाना झाले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ३५ आमदार असल्याचेही म्हटले जात आहे. (thackeray government big decision on FIR)
एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. अशात राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक आज पार पडली आहे. या बैठकीत ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठाकरे सरकार २०२१ पर्यंतचे सर्व राजकीय गुन्हे मागे घेणार आहे.
सरकार बदलल्यास होणारी अडचण टाळण्याची तजबीज या निर्णयातून करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तसेच या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री उपस्थित होते. मात्र शिवसेनेचे फक्त तीनच मंत्री या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
विधान परिषदेनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात मोठे बंड पुकारले आहे. मंगळवारी दिवसभर ते सुरतमध्ये होते, तर रात्री ते गुवाहटीला गेले. एकनाथ शिंदेंच्या या टोकाच्या पाऊलामुळे राज्यात सत्ता पालट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अशात मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत २०२१ पर्यंतचे सर्व राजकीय गुन्हे मागे घेण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जर राज्यातील सरकार बदलले तर ठाकरे सरकारने घेतलेला हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.
शिवसेनेचे नाराज मंत्री सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीला कोणकोण उपस्थित असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहिलेले होते, तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या बैठकीला उपस्थित नव्हते.
महत्वाच्या बातम्या-
स्वाभिमान गहाण ठेवला नाही नसून मुठभर मावळ्यांसोबत राखेतून अस्तित्व घेऊन पुन्हा उभे करणार;अरविंद सावंत यांनी केला विश्वास व्यक्त
‘शिवसेनेने भाजपसोबत जायला हवे’, बंड न केलेल्या आमदाराचाही उद्धव ठाकरेंना सल्ला
पवारांशी गेम.., आघाडीतून बाहेर पडण्यासाठी शिवसेनेने केलंय हे महानाटक? ‘या’ पाच गोष्टी देतात पुरावा