Share

लतादीदींचं ‘ते’ अखेरचं स्वप्न होणार पूर्ण; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

प्रसिद्ध गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून त्या बऱ्या झाल्या होत्या. पण त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. (thackeray government announced lata mangeshkar music college)

वयाच्या ९२ व्या वर्षी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपुर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. लता मंगेशकरांच्या निधनानंतर अनेत दिग्गज नेते मंडळी आणि कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळीही अनेक कलाकार उपस्थित होते.

लतादीदींच्या जाण्याने देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून लता मंगेशकरांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. आता लता मंगेशकरांच्या निधनानंतर महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लतादीदींचे अखेरचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

मुंबईत भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नाव्याने एक भव्य संग्रहालयदेखील उभारण्यात येणार आहे.

मुंबईतील कलिना कॅम्पससमोरील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ३ एकर जागेवर हे महाविद्यालय उभारलं जाणार आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचं लतादीदींचं स्वप्न होतं, पण वेळेत जागा उपलब्ध झाल्याने त्यावेळी ते होऊ शकले नव्हते.

तसेच हे महाविद्यालय स्थापन करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्याच समितीने महाविद्यालयाचं नाव लता दीनानाथ मंगेशकर ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता. संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास, विकास, प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी सुसज्ज आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं संगीत महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
IND vs WI: वेस्ट इंडिज संघाला दुसऱ्या सामन्यात धूळ चारत टीम इंडियाने जिंकली वनडे सिरीज
चीनमध्ये बनवला आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, 1600 तुकडे करून आणला भारतात, किंमत वाचून अवाक व्हाल
SIP calculator: महिन्याला केवळ १००० रुपये जमा करा, तुम्हाला मिळतील २ कोटींपेक्षा जास्त रुपये

राजकारण

Join WhatsApp

Join Now