Share

सौंदर्यामध्ये सगळ्या अभिनेत्रींना तोड देते तेरे नाममध्ये भिकारी दिसणारी ‘ही’ अभिनेत्री, पहा फोटो

आजही तेरे नाम हा चित्रपट अनेकांच्या आवडीचा चित्रपट आहे. याच चित्रपटाने सलमान खानच्या बुडत्या करिअरला वाचवले होते. २००३ साली हा चित्रपट आला होता. तेरे नाम हा चित्रपट त्या वर्षीचा सर्वात हिट चित्रपट होता.

सतीश कौशिक हे या चित्रपटाचे निर्माते होते. आजही अनेक लोक तेरे नाम सारखी केसांची स्टाईल करतात. त्यावेळी तो फॅशन ट्रेंड बनला होता. हा तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. तुम्ही जर चित्रपट नीट पहिला असेल तर तुम्हाला आठवेल की यामध्ये एका भिकारिण होती.

या भिकारीणच्या रोलने सर्वांची मने जिंकली होती. आजही लोकांना तो सिन आठवतो जेव्हा ती सलमान खानला जेव्हा वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये नेतात तेव्हा ती भिकारीण गाडीच्या मागे त्याला रोखण्यासाठी धावते. त्या सिनने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते.

पण तुम्हाला माहीत नसेल त्या अभिनेत्रीचे नाव राधिका चौधरी आहे. दाक्षिणात्य चित्रपटातील हे एक प्रसिद्ध नाव आहे. तिने अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. जरी ती या चित्रपटात फाटके कपडे घातलेली, घाण, केस विस्कटलेली भिकारीण दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात ती खूप सुंदर आहे.

तिने आपल्या करिअरला सुरुवात १९९९ मध्ये केली होती. तिने आधी तेलुगू चित्रपटात काम केले होते. तिने सर्वात आधी खुशी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. तिने अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आणि अचानक ती फिल्म इंडस्ट्रीतून गायब झाली.

दाक्षिणात्य चित्रपटातून तिने खूप नाव कमावलं होतं. बॉलीवूडपेक्षा जास्त तिला लोक तेलुगू चित्रपटातून ओळखू लागले होते. पण सध्या ती फिल्म इंडस्ट्रीपासून लांबच राहते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा आणि जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला भेट द्या.

महत्वाच्या बातम्या
मिथून चक्रवर्तीपासून ते अनुपम खेरपर्यंत, जाणून घ्या काश्मिर फाईल्ससाठी कोणी किती कोटी घेतले?
धनंजय मुंडे यांनी सहा-सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या आहेत’, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप
३० वर्षांपासून ओढत होता सिगरेट, अचानक पिवळे पडले पूर्ण शरीर; डॉक्टर म्हणाले…
रोज रात्री गर्लफ्रेंडच्या बाथरूममधून यायचा दुर्गंध; फरशी तोडताच समोर आलं थरकाप उडवणारं सत्य

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now