Share

‘या’ ५ वर्षाच्या गरीब पोराच्या बॅटींगचा फॅन झाला सचिन; खूष होत स्वत: दिली ५ दिवस ट्रेनिंग

sachin tendulkar

मुंबई। क्रिकेट विश्वातील देव म्हणून प्रसिद्ध क्रिकेटर सचिन तेंडुलकरकडे पाहिले जाते. तरुण पिढीपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्याच मनात सचिनची एक वेगळीच छाप आहे. सचिन हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरतो.

आता अशाच एका भन्नाट व्हायरल व्हिडिओमुळे चाहत्यांनी सचिनला पुन्हा डोक्यावर घेतले आहे. सचिन नेहमीच आपल्या चाहत्यांची मदत करत असतो. युवा खेळाडूंचा आदर्श बनलेला सचिन तेंडुलकर आपल्या चाहत्यांना नाराज होण्याची संधी देत नाही. जमेल तसे त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूही देतो.

काही दिवसांपूर्वी एस.के. शाहीद या ५ वर्षीय खेळाडूचा फलंदाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. शाहीदचा हा व्हिडिओ त्याच्या पालकांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांनी सचिन तेंडुलकर, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन आणि दिवंगत शेन वॉर्न यांना टॅग केले होते.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओने आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि दिवंगत शेन वॉर्नचेही लक्ष वेधून घेतले होते. छोट्या शाहिदची कामगिरी बघून वॉर्ननेही त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचेही त्याने लक्ष वेधून घेतले.

व्हिडीओ बघून काही दिवसांतच त्याला ‘तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमी’ मध्ये सराव करण्याची संधी मिळाली. खुद्द सचिन तेंडुलकरसोबत ५ दिवस सराव करण्याची सुवर्णसंधी शाहिदला मिळाली. तसेच नेटमध्ये फलंदाजी करताना सचिननेही शाहिदच्या फलंदाजीचा मनसोक्त आनंद घेतला.

शाहिदचे वडील कोलकात्यातील एका हेअर सलूनमध्ये काम करतात. त्यांनी गेल्या महिन्यात आपल्या मुलाचा म्हणजेच शाहिदचा फलंदाजी करतांनाचा व्हिडिओ काढला होता. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. त्यांची इच्छा होती की आपल्या मुलाचा आदर्श असलेल्या सचिन तेंडुलकरने हा व्हिडीओ पाहावा. त्यानंतर त्यांचे आणि छोट्या शाहिदचे स्वप्न पूर्ण झाले.

शाहिदचे वडील शेख शमशेर पीटीआयशी (PTI) बोलतांना म्हणाले की, आम्ही आमच्या ट्विटर हँडलवरून व्हिडिओ अपलोड केला होता. हा व्हिडिओ पाहून ऑस्ट्रेलियन चॅनल फॉक्स स्पोर्ट्सने देखील ट्विट केले होते. आम्हाला वाटते की, सचिन सरांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर त्यांच्या टीमने आमच्याशी संपर्क साधला.

त्यानंतर शाहीद आणि त्याच्या कुटुंबाच्या मुंबई दौऱ्याचा संपूर्ण खर्च देखील सचिनने उचलला होता. त्याचबरोबर सचिनने स्वतः यावेळी त्याला मोलाचे मार्गदर्शनही केले. तसेच ५ दिवस सराव करण्याची सुवर्णसंधी देऊन, फलंदाजीचे उत्तम धडे दिले. या सर्व गोष्टींचा आणि सचिन तेंडुलकरच्या मार्गदर्शनाचा छोट्या शाहिदला भविष्यात नक्कीच फायदा होईल.

 

महत्वाच्या बातम्या:
CID फेम दया दिसणार नव्या भूमिकेत, ‘या’ मराठी चित्रपटात मिळाली महत्वाची भूमिका, प्रेक्षक उत्सुक
या’ ३ रुपयांच्या स्टॉकने केला मोठा धमाका, १ लाखांचे केले तब्बल १८ लाख, गुंतवणूकदार मालामाल
यशवंतराव चव्हाणांनी मुख्यमंत्रीपद पणाला लावले म्हणून आपण मोफत शिकतोय, वाचा ‘ती’ सत्य घटना..
‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीची रॅम्प वॉक करतांना झाली फजिती! स्कर्टचेच तुटले बटन अन….

 

 

 

इतर खेळ मनोरंजन

Join WhatsApp

Join Now