बंगळुरू:- मंदिरांच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकणाऱ्या एका व्यक्तीला कर्नाटकमधील बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. देवदास देसाई असं या आरोपीचं नाव आहे. आपण हे सर्व येशूचा संदेश देण्यासाठी करत आहोत आणि याबद्दल आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचं आरोपी देवदास देसाई याने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितलं आहे.
बंगळुरू पोलीस जवळपास वर्षभरापासून या आरोपीचा शोध घेत होते. देवदास देसाई हा आरोपी मंदिर परिसरात ठेवण्यात आलेल्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकायचा आणि तिथून निघून जायचा. बंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६२ वर्षीय आरोपी देवदास देसाईने हे कृत्य बंगळुरूच्या अनेक मंदिरांमध्ये केले आहे. बराच काळ पोलीस या आरोपीचा शोध घेत होते. प्रत्येक वेळी पोलिसांच्या तावडीतून हा आरोपी पळून जाण्यात यशस्वी होत होता.
पण गेल्यावर्षी २७ डिसेंबर रोजी ‘कोरजना कट्टे’ या गावातील एका मंदिराच्या दानपेटीत वापरलेला कंडोम मिळाल्याची बातमी पोलिसांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच बंगळुरू पोलिस कोरजना कट्टे या गावात पोहचले. पोलिसांनी मंदिर आणि त्याजवळ असलेल्या परिसरातील सर्व कॅमेऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले.
पोलीस अधिकाऱ्यांना त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत होता. त्याआधारे बंगळुरू पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली. पोलिसांनी या आरोपीची चौकशी केली असता, त्याने अशाप्रकारचे कृत्य अनेक मंदिरांमध्ये केल्याचं मान्य केलं. देवदास देसाई या आरोपीने बंगळुरू शहर आणि त्याजवळील परिसरातील एकूण १८ मंदिरांमध्ये हे कृत्य केले आहे.
मात्र या १८ मंदिरांपैकी केवळ पाच मंदिरांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. बंगळुरू पोलीस आयुक्त एन शशीकुमार यांनी सांगितले की, “सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांचे पथक आरोपीला पकडण्यात यशस्वी झाले. देवदास देसाईनं त्यांच्या पत्नी आणि मुलांना फार पूर्वीच सोडून दिलं आहे. तो ऑटो ड्रायव्हर म्हणून काम करायचा, पण म्हातारपणामुळे त्याने ड्रायव्हिंग सोडून प्लास्टिक पिकरचं काम करायला सुरुवात केली आहे.”
पोलीस आयुक्त शशीकुमार यांच्या म्हणण्यानुसार, तो मंदिरांमध्ये वापरलेले कंडोम फेकत असे जेणेकरून त्यांची विटंबना करून तो लोकांना त्याच्या धर्माकडे वळवू शकेल. केवळ मंदिरातच नाही तर काही गुरुद्वारा आणि मशिदींमध्येही या आरोपीने हे कृत्य केले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान या आरोपीने सांगितले की, त्याला त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. तो फक्त येशूचा संदेश पसरवत होता.
महत्वाच्या बातम्या :-
‘बर्गर आणला नाही तर संपूर्ण घर पेटवून देईल’, भुकेल्या मुलाची धमकी ऐकून वडिल पोहोचले थेट कोर्टात
कोरोनामध्ये लग्न रद्द झाल्यास मिळणार १० लाखांचा विमा, जाणून घ्या काय आहे ही स्कीम
धक्कादायक! वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी; १२ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी