इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. भारताने ५० धावांनी हा सामना जिंकला आहे. भारताच्या विजयात हार्दिक पांड्याने(Hardik Pandya) मोलाची भूमिका बजावली आहे. हार्दिक पांड्याने या सामन्यामध्ये उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे. या विजयासह भारताने( या टी-20 मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.(Tema india win aganist england in first t-20 match, hardik pandya played important role)
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा हा सलग १३ विजय आहे. सलग १३ सामने जिंकणारा रोहित शर्मा भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. या सामन्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात रोहित शर्माने १४ चेंडूत २४ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये भारताने २ बाद ६६ धावा केल्या होत्या.
दीपक हुड्डाने या सामन्यात १७ चेंडूंमध्ये ३३ धावा केल्या. या खेळीत दीपक हुड्डाने तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. इंग्लंडचा गोलंदाज क्रिस जॉर्डनच्या चेंडूवर दीपक हुड्डा बाद झाला. सूर्यकुमार यादवने या सामन्यात ३९ धावा केल्या. क्रिस जॉर्डनच्या एका उसळत्या चेंडूवर सूर्यकुमार यादव झेलबाद झाला. या सामन्यात हार्दिक पांड्याने झंझावाती खेळी केली.
हार्दिक पांड्याने केवळ 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. भारतीय संघाने या सामन्यात ८ बाद १९८ धावा केल्या. इंग्लंडला विजयासाठी १९९ धावांची गरज होती. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकात कर्णधार जोस बटलरल शून्यावर बाद झाला. भुवनेश्वर कुमारने त्याला बोल्ड केले.
पाचव्या षटकात कर्णधार रोहित शर्माने चेंडू हार्दिक पांड्याकडे सोपवला. हार्दिक पांड्याने त्याच्या पहिल्याच षटकात इंग्लंडचा खेळाडू लिव्हिंगस्टोनला बाद केले. त्यानंतर हार्दिक पांड्याने इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयला देखील बाद केले. पण मोईन अली आणि हॅरी ब्रूकने सावध फलंदाजी करत ६१ धावांची भागीदारी केली.
त्यानंतर युझवेंद्र चहलने एकाच षटकात मोईन अली आणि हॅरी ब्रूकला बाद केले. यामुळे भारताचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर हार्दिक पांड्याने सॅम कॅरेनला बाद केले. इंग्लंडचा संपूर्ण डाव १४८ धावांवर आटोपला. हार्दिक पांड्याने या सामन्यात इंग्लंडचे चार गडी बाद केले. या सामन्यात युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी दिन गडी बाद केले. यावेळी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ चा पुरस्कार हार्दिक पांड्याला मिळाला.
महत्वाच्या बातम्या :-
…तेव्हा दातखिळी बसली होती का? उद्धव ठाकरेंचा बंडखोर आमदारांना थेट सवाल
उद्धव ठाकरेंचा सोमय्यांकडून माफिया म्हणून उल्लेख; शिंदे गटाने आक्रमक होतं उचललं मोठं पाऊल
टाटा प्रोजेक्ट्स प्रकरणी CBI ची मोठी कारवाई, 6 अधिकाऱ्यांना अटक, वाचा काय आहे प्रकरण?






