दहा दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता राज्यात शिंदेशाही पर्वास सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत ते आता राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला होता.
वरिष्ठ पातळीवर ठरल्याप्रमाणे पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव घोषित करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ‘तुम्हाला उपमुख्यमंत्रिपद घ्यावे लागेल,’ असा पक्ष श्रेष्ठींचा फोन येताच फडणवीसांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
वाचा नेमकं काय घडलं.. पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा केली. आणि त्यानंतर फडणवीस थेट ‘सागर’ बंगल्यावर आले. आपल्या निवासस्थानी फडणवीस नेते आणि आमदारांशी चर्चा करत होते.
नेमकं त्याच वेळी फडणवीस यांना थेट दिल्लीहून फोन आला. ‘तुम्हाला उपमुख्यमंत्रिपद घ्यावे लागेल’ असे तिकडून सांगण्यात येताच फडणवीस यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्याचबरोबर फडणवीस यांच्या डोळ्यातील अश्रु पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वच भावुक झालेले पाहायला मिळाले.
मात्र यातून फडणवीस स्व: ता सावरले. ते आपल्या नेते मंडळींना समजावू लागले. मात्र अशातच फडणवीस यांना दिल्लीहून राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा फोन आला. तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा, असा आदेश आला मात्र फडणवीस यांनी त्याला पहिल्यांदा स्पष्ट नकार दिला.
दरम्यान, पुन्हा फोन आला तेव्हा फडणवीस तातडीने आतल्या खोलीत गेले. बोलण झाल्यावर फडणवीस बाहेर आले. ‘मला पक्षाने आत्ताच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला सांगितले आहे. तेव्हा मी शपथ घेतोय’ असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी फडणवीसांचा चेहरा पडला होता.
तसेच तेथून पुन्हा सर्वजण राजभवनवर आले. शपथविधी झाला. अन् अखेर पक्षादेश मान्य करून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील अशी चर्चा होती. पण पक्षादेश मान्य करून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले.
महत्त्वाच्या बातम्या
बातमी विद्यार्थ्यांसाठी! बारावीनंतर ‘हे’ कोर्सेस करा, नोकरीची १०० टक्के खात्री
आलिया-दीपिका नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे रणबीर कपूरची फेव्हरेट, म्हणाला, तिच्यासोबत रोमान्स…
‘त्या’ पत्राने घात केला अन् शिकारी स्वतःच जाळ्यात अडकला; वाचा फडणवीसांबद्दल नेमकं काय घडलं
KGF मधील प्रसिद्ध अभिनेत्याचा भयानक अपघात, कारला ट्रकने दिली धडक, पोलिसांनी ट्रक चालकाला घेतलं ताब्यात