धर्मशाला येथे झालेल्या T20 सामन्यात भारताने (india) श्रीलंकेचा (srilanka) सहज पराभव केला. एकेकाळी टीम इंडियासाठी कठीण परिस्थिती निर्माण होत होती, मात्र श्रेयस अय्यर (shreyas ayyar) आणि रवींद्र जडेजा (ravindra jadeja) यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने लक्ष्य गाठले. भारताने मालिकेतील सलग दुसरा सामना जिंकून मालिकाही जिंकली.
श्रीलंकेने भारताला १८४ धावांचे लक्ष दिले होते. टीम इंडियाला सुरुवातीलाच धक्का बसला. पण श्रेयस अय्यर आणि संजू (sanju samson) सॅमसन यांच्यातील पहिली 84 धावांची भागीदारी आणि शेवटी रवींद्र जडेजाची तुफानी खेळी यामुळे सामना एकतर्फी झाला. शेवटी, भारताने हा सामना 7 विकेटने जिंकला, टीम इंडियाने तीन षटकांसह हा सामना संपवला.
श्रेयस आणि संजू सॅमसन रॉक
धर्मशालाच्या मैदानात श्रीलंकेने भारताला 184 धावांचे लक्ष्य दिले, ही मोठी धावसंख्या होती. टीम इंडियाच्या पहिल्या दोन विकेट पाच षटकांतच पडल्या. अशा स्थितीत श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसनने खेळ सावरला. दोघांनी आधी भागीदारी रचली आणि नंतर धावांचा पाऊस सुरू केला.
श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसनने अवघ्या 47 चेंडूत 84 धावांची भागीदारी केली. आपल्या खेळीत संजू सॅमसनने अवघ्या 25 चेंडूंत 39 धावा केल्या, ज्यात दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. तर श्रेयस अय्यरने 44 चेंडूत 6 चौकार आणि चार षटकारांसह 74 धावा केल्या.
‘सर’ जडेजाने केला कहर
शेवटच्या षटकात जेव्हा टीम इंडियाला जास्त रनरेटने धावा करायच्या होत्या, तेव्हा रवींद्र जडेजा क्रीजवर आला. रवींद्र जडेजाने येताच फटकेबाजी सुरू केली. रवींद्र जडेजाने अवघ्या 18 चेंडूंत 7 चौकार आणि एका षटकारासह 45 धावा केल्या. 250 च्या स्ट्राईक रेटने खेळल्या गेलेल्या या खेळीमुळे अखेरीस भारताच्या बाजूने सामना एकतर्फी झाला.
श्रीलंकेनेही जोरदार फलंदाजी केली
श्रीलंकेची सुरुवात काही खास नव्हती, श्रीलंकेने अवघ्या 11 षटकांत 76 धावा केल्या होत्या. पण शेवटच्या पाच षटकांत श्रीलंकेने जवळपास ८० धावा केल्या आणि आपली धावसंख्या १८३ पर्यंत नेली. शेवटी श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका आला आणि त्याने अवघ्या 19 चेंडूत 47 धावा केल्या. त्याआधी पथुम निसांकाने केवळ 53 चेंडूत 75 धावा केल्या होत्या. भारताकडून हर्षल पटेलने चार षटकांत ५२ धावा दिल्या.
भारताचे शेवटचे 11 T20 सामने
विरुद्ध अफगाणिस्तान – विजय (कर्णधार – विराट कोहली)
विरुद्ध स्कॉटलंड – विजय (कर्णधार – विराट कोहली)
विरूद्ध नामिबिया – विजय (कर्णधार – विराट कोहली)
विरुद्ध न्यूझीलंड – विजय (कर्णधार – रोहित शर्मा)
विरुद्ध न्यूझीलंड – विजय (कर्णधार – रोहित शर्मा)
विरुद्ध न्यूझीलंड – विजय (कर्णधार – रोहित शर्मा)
विरूद्ध वेस्ट इंडिज – विजय (कर्णधार – रोहित शर्मा)
विरूद्ध वेस्ट इंडिज – विजय (कर्णधार – रोहित शर्मा)
विरूद्ध वेस्ट इंडिज – विजय (कर्णधार – रोहित शर्मा)
विरुद्ध श्रीलंका – विजय (कर्णधार – रोहित शर्मा)
विरुद्ध श्रीलंका – विजय (कर्णधार – रोहित शर्मा)
महत्वाच्या बातम्या
मुंबई हादरली! सोशल मीडियावर झाली मैत्री, वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून शिक्षिकेला दारू पाजली अन्..
पिंपरीतील हॉटेलमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, प्रसिद्ध अभिनेत्रीसह ३ तरुणींची सुटका
गंगुबाई काठियावाडी ठरली फ्लॉप, तर साऊथच्या ‘या’ चित्रपटांनी केली तिप्पट कमाई; कमाई वाचून तोंडात बोटं घालाल
आज करोडोची मालकीन असणाऱ्या कंगनाकडे एकेकाळी कपडे घ्यायलाही पैसे नव्हते