भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना JSCA इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची येथे खेळला गेला. जिथे न्युझीलंड संघाने 21 धावांनी सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. या सामन्यात (IND vs NZ) टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्युझीलंड संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा केल्या.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या T20 सामन्यात (IND vs NZ), सलामीवीर ड्वेन कॉनवे आणि डॅरिल मिशेल यांनी टीम इंडियाविरुद्ध शानदार अर्धशतके झळकावली. किवी संघासाठी कॉनवेने 35 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 52 धावांची खेळी केली.
त्याचवेळी मिशेलने 30 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 59 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याच्याशिवाय फिन ऍलनने 35 धावांचे मोठे योगदान दिले. यामुळे त्यांना मोठा स्कोअर करता आला. या सामन्यात (IND vs NZ) भारताकडून वाशींग्टन सुंदरने 2 विकेट घेतल्या तर शिवम मावी, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनी 1-1 विकेट घेतल्या. बाकी गोलंदाजांना विकेट्स मिळाल्या नाहीत.
किवी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज अपयशी ठरले. 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना या सामन्यात (IND vs NZ) टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर ईशान किशन (4) आणि शुभमन गिल (7) स्वस्तात बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले.
यानंतर राहुल त्रिपाठी खाते न उघडता बाद झाला. मधल्या फळीत सूर्यकुमार यादवने भारतीय डाव सांभाळला पण त्याची आतषबाजीही ४७ धावांवर संपुष्टात आली. यादरम्यान त्याने 34 चेंडूंचा सामना केला आणि 6 चौकार आणि 2 षटकारही मारले. त्याचवेळी हार्दिक पांड्याने केवळ 21 धावांचे योगदान दिले. पण हे दोघे बाद होताच भारताचा डाव पत्त्यांप्रमाणे कोसळला.
हार्दिकच्या चुकीमुळेच भारताचा पराभव झाला. विशेष म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने या सामन्यात (IND vs NZ) काही चुकीचे निर्णय घेतले, ज्यामुळे हा सामना भारताच्या हातातून निसटला. त्याचे अनेक निर्णय भारताला महागात पडले.
गोलंदाजी करताना त्याने शेवटचे षटक अर्शदीप सिंगला दिले. याचा परिणाम असा झाला की अर्शदीप सिंगने 1 नो बॉल दिला आणि या षटकात त्याने एकूण 26 धावा दिल्या. यामुळेच न्युझीलंडला बलाढ्य स्कोअर उभा करता आला.
त्याचवेळी शिवम मावीकडे 3 षटके शिल्लक होती पण हार्दिकने त्याला फक्त 1 षटक टाकले. यासोबतच फॉर्मात असलेल्या पृथ्वी शॉला संधी दिली नाही. शुभमन गिल हा टी-20 खेळाडू नाही हे माहीत असूनही त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी देण्यात आली.
तसेच नानेफेक जिंकल्यानंतरही हार्दीक पांड्याने प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. तोही निर्णय चुकीचा ठरला. या सर्व चुकांची किंमत भारताला पराभवासह चुकवावी लागली. त्यामुळे भारताला पराभव स्विकारावा लागला.
महत्वाच्या बातम्या
पहा जेनेलीया डिसूझा आणि रितेश देशमुखच्या लग्नाचे कधीही न पाहीलेले सुंदर फोटो
मविआ जिंकणार लोकसभेच्या ३४ जागा, भाजप-शिंदेगटाला बसणार मोठा फटका! सर्वेतून समोर आले निष्कर्ष
सूर्याने मोडला पाकिस्तानचा माज; बाबर-रिझवानला डावलून ICC ने सुर्याला दिले ‘हे’ खास बक्षीस
सुप्रिया सुळेंना पहिल्या नजरेतच खूप आवडला होता ‘हा’ अभिनेता; त्याला गुपचूप मेसेज केला अन्…





