कोरोना काळात विषणूचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी सरकारने लॉकडाउनचा निर्णय जाहीर केला होता. यामुळे मुलांच्या आरोग्यासाठी शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र नंतर विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होऊ नये, म्हणून सरकारने ऑनलाइन शिक्षणाचा निर्णय घेतला. (teacher throws mobile phone in fire)
आता कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने काही प्रमाणात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. डोळ्यांच्या आरोग्यासाठी शाळेत विद्यार्थ्यांना मोबाईल वापरायला दिला जात नाहीये. मात्र तरी देखील बरेच विद्यार्थी चोरून फोन वापरत असल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून येत आहे.
अशातच एक एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तूफान व्हायरल होतं आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत चोरून फोन खेळल्याने त्यांच्या शिक्षकाने त्यांना शिक्षा दिली आहे. मात्र मुलांना दिलेली शिक्षा पाहून तुम्हाही धक्का नक्कीच बसेल. चक्क या शिक्षिकेने विद्यार्थ्यांचे फोन आगीत टाकून दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ इंडोनेशियातील एका बोर्डिंग स्कूलमधील आहे. तसेच या शिक्षिकेला फ्लेम थ्रोअर बोललं जात आहेत. तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता काही शाळेचे विद्यार्थी दिसत आहेत. समोर एका ड्रममध्ये आग लावलेली आहे. शिक्षिका या आगीत मोबाईल फेकताना दिसते आहे.
https://www.instagram.com/reel/CaM9pgfM3VN/?utm_source=ig_web_copy_link
धक्कादायक बाब म्हणजे एक-दोन नव्हे तर एकेएक करत ती असे बरेच मोबाईल या आगीत फेकते. त्याचवेळी तिला पाहून आणखी एक शिक्षिका येते, तीसुद्धा या आगीत मोबाईल टाकते. सध्या हा व्हिडिओ तूफान व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून पालकांकडून देखील तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ पाहून काही युझर्सनी शिक्षिकेच्या अशा कृत्यावर टिका केली आहे. शिक्षिकेने हे फोन पालकांच्या स्वाधीन करायला हवे होते, असं त्यांनी म्हटलं आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणत व्हायरल झाला असून या घटनेचा अधिक माहितीसाठी तपास सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
अखेर शालिनी हत्या प्रकरणाचा झाला उलगडा, प्रियकरानेच केली होती हत्या, कारण ऐकून पोलिसही चक्रावले
नोकरी सोडा अन् 25 हजारात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, महिन्याला 3 लाखांपर्यंत होईल कमाई; सरकार देतंय 50% अनुदान
मित्रांनी आधी दारू पाजली मग.., खेड घाटात झालेल्या तरुणाच्या हत्येचे गूढ उकलले, वाचून धक्का बसेल
शिवसेनेला मोठा धक्का! आयकर विभागाच्या रडारवर ‘हा’ बडा नेता, IT विभागाने घरी मारली धाड