Share

तो माझ्यावर बलात्कार करत होता, पण मी त्याला विरोध करु शकले नाही; तरुणीने सांगितले ‘त्या’ टॅटू आर्टिस्टचे भयानक सत्य

टॅटू काढणे सध्या ट्रेंडमध्ये आहे. पण केरळमधील कोचीच्या एका टॅटू पार्लरमध्ये जे घडलं, त्याने संपूर्ण देश हादरला आहे. पार्लरमध्ये १८ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. तरुणीने फेसबुक पोस्ट लिहून ही संपूर्ण घटना शेअर केली आहे. (tattoo artist rape on girls )

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत कारवाई सुरू केली आहे. एवढेच नाही तर ही पोस्ट समोर आल्यानंतर अनेक पीडित महिला पुढे आल्या आहेत ज्यांच्यावर आरोपीने प्राणघातक हल्ला करत बलात्कार केला होता. जवळपास २० महिलांनी त्याच टॅटू आर्टिस्ट विरुद्ध तक्रार केली आहे.

मुलीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, तिला पाठीच्या खालच्या बाजूला टॅटू बनवायचा होता. त्यासाठी तिला एकांताची गरज होती. त्यामुळे तो तिला आत घेऊन गेला. टॅटू बनवताना कलाकाराने लैंगिक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यामुळे ती अस्वस्थ झाली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला.

पीडिता म्हणते, मला तेथून पळून जायचं होतं. मी अशी अडकून पडेन असं कधीच वाटलं नव्हतं. मी एक शब्दही बोलू शकले नाही आणि मी त्याला थांबवू सुद्धा शकले नाही. मला तिथेच मरुन जावे असे वाटले. मला त्या गोष्टीचा खुप त्रास होत होता, पण त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मला काहीच करता आले नाही.

पीडितेच्या पोस्टनंतर, आणखी दोन महिला पुढे आल्या ज्यांनी त्याच टॅटू पार्लरबद्दल अशाच घटनेचा उल्लेख केला. एका तरुणीचे म्हणणे आहे की. जेव्हा तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली, तेव्हा आणखी २० महिला आल्या ज्यांनी अशाच घटनेचा उल्लेख केला आहे.

पोलिसांचे म्हणणे आहे की, टॅटू स्टुडिओ बंद असल्याचे पाहून आम्ही त्याच्या मालकाच्या घरीही गेलो. पण, त्याचे घरही बंद होते. लेखी तक्रार करता यावी यासाठी पोलिस तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. लेखी तक्रार नसल्यामुळे पोलिसांना कारवाई करता येत नाहीये. तर दुसरीकडे टॅटू आर्टिस्ट हे आरोप फेटाळत आहे.

महत्वाच्या बातम्या-
युक्रेनमधील विद्यार्थ्यांची मोदींनी घेतली भेट; म्हणाले, याला आम्ही नाही तर आधीची सरकारेच जबाबदार
…तरच आम्ही तिघी तुझ्याशी लग्न करु; तरुणींनी ठेवली तरुणासमोर अजब अट, त्यानेही मान्य करुन केले लग्न
कांदा कापताना आईच्या डोळ्यातून येत होते अश्रू, ते थांबवण्यासाठी सातवीच्या ओंकारने केली स्मार्ट चाकूची निर्मिती

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now