Share

टाटाच्या ‘या’ कंपनीने शेअर मार्केटमध्ये घातला धुमाकूळ, राधाकृष्ण दमानींनी सुद्धा केलीय गुंतवणूक

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे हे जोखमीचे काम आहे. पण त्याचा जर अभ्यास करुन तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्ही नक्कीच मालामाल होऊ शकतात. शेअर मार्केटमध्ये काही कंपन्या अशा आहेत, ज्यांच्या शेअरच्या किंमती नेहमी वाढतच जातात. टाटा ग्रुपमध्ये असणाऱ्या कंपन्यांचेही तसेच काहीसे आहे. (tata trent share good returns)

टाटा ग्रुपमध्ये असणाऱ्या कंपनींच्या शेअरच्या किंमती या वाढतच जाताना दिसतात. कोरोना महामारीमुळे भारतीय शेअर मार्केट पूर्णपणे खाली पडले होते. पण कोरोना नियंत्रणात येताच परिस्थिती चांगली होऊ लागली. या काळात टाटांच्या अनेक कंपन्यांनी चांगला नफा दिला आहे.

गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणाऱ्या कंपन्यांपैकी ट्रेंट लिमिटेड एक आहे. गेल्या काही वर्षांपासून या कंपनीचा शेअर गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देताना दिसून येत आहे. अशातच या शेअरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. हा शेअर १४३० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

ही कंपनी चांगला परतावा देत असल्यामुळे या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. कंपनीने गेल्या महिन्यात स्टँडअलोन आधारावर जवळपास ५३ टक्के महसूली वाढ केली आहे. जी पीअर रिटेल खेळाडूंमध्ये सर्वाधिक महसूल आहे.

ट्रेंट कंपनी वेस्टसाईड, जुडीओ, स्टार, झारासारखे ब्रँड चालवते. चालु आर्थिक वर्षांच्या तिमाहित कंपनीला चांगली मागणी मिळत आहे. कंपनी पुढील आर्थिक वर्षापर्यंत १३५ स्टोअर्स उघडण्याची शक्यता आहे ट्रेंट कंपनी सध्या त्यांच्या स्पर्धांकांच्या शर्यतीत खुप पुढे आहे.

येत्या २ ते ३ वर्षात या कंपनीची चांगली वाढ होणार आहे. त्यामुळे या शेअरच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या शेअरची किंमत १४३० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जी की मागील शेअर बंदच्या तुलनेत २८ टक्क्यांहून अधिक आहे. सध्या या शेअरची किंमत १०६८ रुपये आहे. या शेअरमध्ये प्रसिद्ध गुंतवणूदार राधाकृष्ण दमानी यांनीही पैसे गुंतवले आहे.

महत्वाच्या बातम्या-
दिपिका पदूकोनची तब्येत बिघडली; ह्रदयविकाराच्या त्रासामुळे तातडीने हाॅस्पीटलमध्ये केलं दाखल
गाढविनीच्या दुधापासून बनवलेले पनीर असते सोन्यापेक्षा महाग, किंमत वाचून चक्रावून जाल
‘या’ कारणामुळे पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी नाकारली? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now