टाटा स्टील ही भारताची प्रसिद्ध कंपनी आहे. अनेकदा टाटा स्टील कर्मचाऱ्यांचे हिताचे निर्णय घेताना दिसून येते. सध्या असाच एक निर्णय टाटा स्टीलने घेतला आहे. त्यामुळे टाटा स्टील कंपनी चांगलीच चर्चेत आली आहे. टाटा स्टीलने कंपनीमध्ये ठराविक कालावधीसाठी सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना एक ऑफर दिली आहे. (tata steel offer company employee)
कंपनीने सेपरेशन आणि जॉब ऑफर स्कीम सुरु केली आहे. कर्मचारी १ जून ते ३० जून या कालावधीत या दोन्ही योजनांसाठी अर्ज करू शकतात. जॉब फॉर जॉब योजनेंतर्गत, कर्मचारी त्यांचा मुलगा, मुलगी, जावई किंवा इतर कोणत्याही आश्रित व्यक्तीचे नाव देऊन नोकरी हस्तांतरित करू शकतो.
टाटा स्टीलने या दोन योजना एकत्र करून त्याचे नाव ‘गोल्डन फ्युचर प्लॅन’ असे दिले आहे. यासाठी टाटा स्टीलचे उपाध्यक्ष अत्रयी सन्याल यांच्या आदेशाने एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. जॉब फॉर जॉब योजनेअंतर्गत, कर्मचारी त्यांचा मुलगा, मुलगी, जावई किंवा आश्रित म्हणून इतर कोणत्याही व्यक्तीकडे नोकरी हस्तांतरित करू शकतील.
तसेच या योजनेचा लाभ फक्त असेच कर्मचारी घेऊ शकतात, ज्यांचे निवृत्तीचे वय किमान साडेपाच वर्षे असेल. यासाठी अवलंबितांना चाचणी उत्तीर्ण करावी लागते. तसेच त्यांना तीन वेळा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर त्यांची प्रशिक्षणार्थी म्हणून सेवा सुरू होईल.
प्रशिक्षण सुरु असताना त्यांना मानधनही देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची सेवा कायम करण्यात येईल. परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या आश्रितांना नोकरीपासून वंचित राहावे लागू शकते. नोकरीत बदली करणाऱ्या कर्मचाऱ्याला दरमहा १३ हजार रुपये दिले जातील.
ESS साठी म्हणजेच (अर्ली सेपरेशन स्कीम) असे कर्मचारी अर्ज करू शकतात, ज्यांचे वय एकतर ४० वर्षांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांनी कंपनीत दहा वर्षे काम केले आहे. या योजनेंतर्गत, कर्मचार्यांना सेवानिवृत्तीपर्यंत विद्यमान मूळ वेतन आणि डीएचा लाभ मिळेल.
निवृत्तीपर्यंत बेसिक आणि डीएमध्ये दरवर्षी एक हजार रुपयांची वाढ होईल. पण या योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्याची सुविधा मिळणार नाही. जर कर्मचाऱ्यांना कंपनीच्या निवासस्थानात राहायचे असेल तर त्यांना भाडे द्यावे लागेल आणि ते वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत राहू शकतात. या योजनांसाठी कर्मचारी निवडण्याचे अधिकार व्यवस्थापनाला असतील.
महत्वाच्या बातम्या-
ऋताच्या लग्नात ऑनस्क्रिन जोडीदारच होता गैरहजर, स्वत: ऋतानेच याबाबत केला मोठा खुलासा
अरे पण तू आहेस कोण?’ औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावले
माझ्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधाची रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट