Share

टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीने शेअर मार्केटमध्ये घातला धुमाकूळ, गुंतवणूकदारांना दिला ७०० टक्के परतावा

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे हे जोखमीचे काम आहे. पण त्याचा जर अभ्यास करुन तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्ही नक्कीच मालामाल होऊ शकतात. शेअर मार्केटमध्ये काही कंपन्या अशा आहेत, ज्यांच्या शेअरच्या किंमती नेहमी वाढतच जातात. टाटा ग्रुपमध्ये असणाऱ्या कंपन्यांचेही तसेच काहीसे आहे. (tata power share price)

टाटा ग्रुपमध्ये असणाऱ्या कंपनींचे शेअरच्या किंमती या वाढतच जाताना दिसतात. कोरोना महामारीमुळे भारतीय शेअर मार्केट पूर्णपणे खाली पडले होते. पण कोरोना नियंत्रणात येताच परिस्थिती चांगली होऊ लागली. या काळात टाटांच्या अनेक कंपन्यांनी चांगला नफा दिला आहे.

गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणाऱ्या कंपन्यांपैकी टाटा पॉवर एक आहे. टाटा पॉवरच्या शेअरची किंमत फक्त दोनच वर्षात ३० रुपयांवरून २३७.५० रुपयांपर्यंत वाढली. रशिया-युक्रेन युद्धाच्या वातावरणातही या स्टॉकने चांगला परतावा दिला आहे.

६ एप्रिल २०२२ रोजी टाटा पॉवरने ५२ आठवड्यात उच्चांक गाठला. तेव्हा कंपनीच्या शेअरची किंमत २९८.०५ रुपये प्रति शेअर होती. म्हणजेच गेल्या दीड महिन्यात हा स्टॉक २० टक्क्यांनी खाली आला आहे. या वर्षी आतापर्यंत या कंपनीच्या शेअरच्या किमतीत ६.५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

तसेच जर आपण गेल्या ६ महिन्यांबद्दल बोललो तर या स्टॉकमधून फक्त ४.५०टक्क्यांचा परतावा दिला गेला आहे. पण एक वर्ष मागे गेले तर कंपनीच्या शेअरची किंमत १०४ रुपयांवरून २३७.५० रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच शेअरने गुंतवणूकदारांना १३० टक्के परतावा दिला आहे.

NSE मध्ये ३ एप्रिल २०२० रोजी टाटा पॉवरच्या शेअरची किंमत ३० रुपये होती. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर कंपनीच्या शेअरची किंमत २३७.५० रुपयांपर्यंत वाढली. म्हणजेच या काळात टाटा पॉवरच्या शेअरच्या किंमतीत ७०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वी या कंपनीवर ज्याने कोणी पैसा लावला असेल तो आज चांगलाच मालामाल झाला असेल.

महत्वाच्या बातम्या-
‘या’ कारणामुळे प्रचंड भडकला गुजरातचा स्टार खेळाडू, ड्रेसिंग रुममध्ये जाऊन हेल्मेट फेकलं अन् बॅटही तोडली
देशाचे तुकडे करणं थांबवा, हे काम तर…; अक्षय कुमारने साऊथ इंडस्ट्रीबद्दल केले मोठे वक्तव्य
सत्तेचा माज! शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी मुंबईतील कुटुंबाला वाळीत टाकले; वाचा नेमकं काय प्रकरण

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now