टाटा मोटर्सने प्रसिद्ध नॅनो कारचे उत्पादन बंद केले असेल, परंतु अद्याप ही कार ऑफरोड झालेली नाही. रतन टाटा यांच्या या ड्रीम कारला नुकताच त्यांच्या कंपनीने नवा लूक दिला आहे. जेव्हा रतन टाटा यांना नॅनो ईव्ही डिलिव्हर करण्यात आली तेव्हा ते स्वतःला फिरायला जाण्यापासून रोखू शकले नाहीत. (tata nano electric car)
इलेक्ट्रा ईव्ही ही इलेक्ट्रिक वाहनांसाठी पॉवरट्रेन बनवणारी कंपनीने नॅनो कार इलेक्ट्रीक कार तयार केली. कंपनीने स्वतः लिंक्डइनवर त्याची माहिती दिली. कंपनीने सांगितले की त्यांचे संस्थापक रतन टाटा यांना केवळ ही कार आवडली नाही तर त्यांनी नॅनो ईव्हीच्या सवारीचा आनंदही घेतला.
कंपनीने सांगितले की, रतन टाटा यांना ७२ व्ही नॅनो ईव्ही कार फक्त आवडलीच नाही, तर त्यांनी याची सवारी देखील केली आहे. Electra EV ने सोशल मीडियावर रतन टाटा सोबत Nano EV चा फोटो देखील शेअर केला आहे. त्या फोटोत रतन टाटा, नॅनो ईव्ही आणि रतन टाटा यांचे सहकारी शंतनू नायडू देखील दिसत आहेत.
कंपनीने फोटोसोबत लिहिले की, टीम इलेक्ट्रा ईव्हीसाठी हा क्षण खुप खास आहे. कारण रतन टाटा यांनी इलेक्ट्रा ईव्हीच्या पॉवरट्रेनवर तयार केलेल्या कस्टम-बिल्ट नॅनो ईव्हीची सवारी केली. रतन टाटा यांना नॅनो ईव्ही डिलिव्हर केल्यानंतर आणि त्यांच्याकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर आम्ही खुप आनंदी आहोत.
नॅनो ईव्ही ही ४ सीटर कार आहे आणि तिची रेंज १६० किमी आहे. ही कार १० सेकंदांपेक्षा कमी वेळेत शून्य ते ६० किमी प्रतितास वेग वाढवते. यामध्ये लिथियम आयर्न बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. या कारबद्दल टाटा मोटर्सचे म्हणणे आहे की, ग्राहकांना अजून चांगला अनुभव मिळण्यासाठी ही कार तयार करण्यात आली आहे.
या कस्टम बिल्ट नॅनो ईव्हीमध्ये ७२ व्ही आर्किटेक्चर वापरण्यात आले आहे. टिगोर ईव्हीमध्येही हीच पॉवरट्रेन वापरली गेली आहे. कंपनीने त्याच्या डिझाइनमध्ये काही बदल केले आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) द्वारे प्रमाणित २१३ किमीची श्रेणी गाठली. असे करताना कंपनीने पॉवरट्रेनमध्ये कोणतेही भौतिक बदल केले नाहीत. तसेच ही जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार असून याची किंमत फक्त २.३० लाख रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ स्टार खेळाडूंना नाही करता येणार आयपीएलमध्ये गोलंदाजी; BCCI ने घेतला मोठा निर्णय
लेकीच्या बाळंतपणासाठी जावयाच्या घरी आलेल्या आईने घेतला गळफास, परिसरात खळबळ
राजस्थानमध्ये बांधली जात आहे जगातील सर्वात मोठी घंटा, ८२ हजार किलोच्या या घंटेचा आवाज ८ किमीपर्यंत येणार