Share

टाटा समुह आक्रमक निर्णय घेणार! ‘हे’ पाच मोठे ब्रँड्स खरेदी करत देणार अंबानींना टक्कर

ratan tata

टाटा ग्रुपने व्यवसाय क्षेत्रात फक्त भारतातच नाही, तर जगभरात नाव कमावले आहे. टाटा ग्रुप अनेकदा त्यांच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे चर्चेत येत असतो. आता टाटा समुहाची कंपनी टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड एक मोठा व्यवहार करण्याच्या तयारीत आहे. (tata group take over this brands)

टाटा समुहाची ही कंपनी पाच मोठे ब्रँड्स खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या माध्यमातून ही कंपनी कंझ्युमर गुड्स सेक्टमधील आपली स्थिती मजबूज करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. ब्लुमबर्गच्या एका वृत्तात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील डिसोजा म्हणाले की, कंपनी टेटली चहा, एट ऑ क्लॉक कॉफी विकते. तसेच इतर कंपन्यांना आम्ही जोडून घेण्यास विचार करत आहोत. मात्र यावेळी त्यांनी ब्रँड्सबाबात माहिती दिली नाहीये.

टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्सची स्थापना २०२० मध्ये झाली होती. तिने बाटली बंद पाणी कंपनी नरिशको बेव्हरेजेस आणि खाद्य ब्रँड सोलफूल यासारख्या कंपन्यांमधील हिस्सा खरेदी करुन आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. त्यानंतर आता त्यांनी थेट पाच ब्रँड्सलाच जोडून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स मुकेश अंबानी यांची रिलायन्स रिटेल व्यतिरिक्त दिग्गज कंपनी युनिलिव्हरशी स्पर्धा करेल. आगामी दिवसांमध्ये रिलायन्स १२ पेक्षा जास्त छोटे किराणा आणि बिगर खाद्य ब्रँड्सला आपल्या कंपनीत समाविष्ट करुन घेऊ शकते. रिलायन्सचे ६.५ अब्ज डॉलर कंझ्युमर गुड्सच्या व्यवसायाचे लक्ष्य आहे.

दरम्यान, जागतिक पातळीवर चलनवाढीमुळे कंपन्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहे. असे असताना आता टाटा समुह विस्ताराची नवीन योजना आखताना दिसून येत आहे. युक्रेन-रशियाचे युद्ध, राष्ट्रीय कृषी, वस्तुंच्या निर्यातीवर बंदी आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे कंपन्यांचा खर्चही वाढला आहे.

महत्वाच्या बातम्या-
पॉलिटिकल थ्रिलर, क्राइम, बोल्ड इंटिमेट सीन; ‘रानबाजार’च्या ट्रेलरने मराठी सिनेसृष्टीत भूकंप
जेष्ठ नेत्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप करत बड्या काॅंग्रेस नेत्याचा राजीनामा
“महिला आयोगाचे अध्यक्षपद फक्त एक महिना माझ्या ताब्यात द्या, कायदा काय असतो दाखवून देईल”

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now