Share

तारकर्ली बोट अपघातात आळेफाट्याचे प्रसिद्ध डाॅक्टर स्वप्निल पिसे यांचा पाण्यात बुडून मृत्यू

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. मालवणमधील तारकर्लीमध्ये पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात बुडाली आहे. या दुर्घटनेत दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. यावेळी बोटीमध्ये एकूण २० पर्यटक होते. त्यातील १६ पर्यटकांना सुखरूप वाचवण्यात आलं आहे. या पर्यटकांतील दोन जणांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. (tarkarli boat accident death junnar doctor)

या घटनेमुळे तारकर्ली परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी काही पर्यटक तारकर्लीमध्ये स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी आले होते. यावेळी स्कुबा डायव्हिंग झाल्यानंतर सर्व पर्यटक बोटीमधून परतत होते. यावेळी ही दुर्घटना घडली आहे. या बोटीमध्ये असणारे सर्व पर्यटक मुंबई, पुणे भागातील असल्याचे सांगितले जात आहे.

बुडालेल्या बोटीचे नाव ‘जय गजानन’ असे आहे. या दुर्घटनेमध्ये दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. असे असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात ज्या दोन लोकांचा मृत्यु झाला आहे, त्यामध्ये जुन्नरच्या एका डॉक्टरांचा आणि शिवसेना आमदाराच्या पुतण्याचा समावेश होता.

जुन्नरचे अस्थिरोगतज्ज्ञ स्वप्नील मारुती पिसे असे डॉक्टरांचे नाव होते. या अपघातात त्यांचा भयानक मृत्यू झाला आहे. स्वप्नील पिसे हे आपल्या कुटुंबासोबत तारकर्ली येथे पर्यटनासाठी गेले होते. पुणे-नाशिक महामार्गावर त्यांचे एक हॉस्पिटल होते. स्वप्नील यांच्यामागे त्यांच्या पत्नी आणि त्यांची एक मुलगी आहे.

तसेच या अपघातात शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचा पुतण्या असल्याचेही समोर आले आहे. आकाश देशमुख असे त्याचे नाव आहे. आकाश देशमुखचाही बुडून मृत्यु झाला आहे. शिवसेनेचे अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांचा तो सख्खा पुतण्या होता. आकाशच्या वडिलांचे काहीच वर्षांपूर्वी निधन झाले होते.

आधी बीए आणि नंतर इंजिनियरिंगचं शिक्षण आकाशने केलं होतं. आकाश सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेची छोटी मोठी कामे कंत्राटावर करत होता. आकाशच्या मागे त्याची आई आणि त्याची विवाहित बहीण असे कुटुंब आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

महत्वाच्या बातम्या-
औरंगजेबानेच तोडली होती मथुरा कशिची मंदिरे; इतिहासकार इरफान हबीब यांनी सांगितले संपुर्ण सत्य
राजकारणात येण्यासाठी तयार आहात का? कपिल देवचे उत्तर ऐकून तुम्हीही कराल कौतुक
नीरज चोप्राने केले वर्ल्ड चॅम्पिअन निखत जरीनचे अभिनंदन, बॉक्सरनेही दिले लक्षवेधी उत्तर, म्हणाली…

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now