Share

‘तारक मेहता का उलटा चष्मा’  फेम अंजली भाभी पैशांसाठी करायची ‘हे’ काम, स्वत:च केला होता खुलासा

सध्या टीव्हीवर अनेक मालिका आहेत अशा आहेत, ज्या मागील अनेक वर्षांपासून सुरू आहेत. यामधील एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ (tarak mehta ka ulta chashma)  ही होय. ही मालिका साल २००८ मध्ये सुरू झाली होती. या मालिकेने मागील अनेक वर्षांपासून चाहत्यांना हसवत  आहे. (tarak mehta fame actress sunaina interview)

यातील सर्वच कलाकार हे चाहत्यांच्या मनात मागील अनेक वर्षांपासून राज्य करत आहेत. दयाबेन, जेठालाल, चंपक चाचा, तारक मेहता, भिडे, माधवी भाभी, टप्पु सेना, बबिता जी या भूमिका सध्या खूप प्रसिद्ध झाल्या आहेत. यातील एक अशी भूमिका जी एका विशिष्ट कारणासाठी प्रसिद्ध आहे.

ती म्हणजे तारक मेहताची पत्नी अंजली भाभी. जी वेगवेगळ्या पद्धतीने तारक मेहताच्या तंदुरुस्तीचे काळजी घेत असते. आपण या मालिकेत पाहिला आहे की, अंजली भाभी नेहमी तारक मेहताला कारल्याचा रस किंवा असे अनेक पदार्थ खाऊ घालत असते. मात्र आता ही भूमिका अभिनेत्री सुनैना फौजदार साकारत आहेत.

या अगोदर अभिनेत्री नेहा मेहता अंजली भाभीची भूमिका साकारत होती. सध्या सुनैना ही यशाच्या शिखरावर आहे. तिला हे यश मिळवण्यासाठी अनेक कष्ट करावे लागले आहेत. सध्या सुनैनाच्या एका मुलाखतीबद्दल खूप चर्चा सुरू आहे. या मुलाखतीमध्ये सुनैनाने तिचे अभिनय क्षेत्रात येण्यामागचे कारण सांगितले.

सुनैनाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तिने लहानपणा पासूनच काम करायला सुरुवात केली होती. तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘खुल जा सिम सिम’ या मालिकेतून केली. या मालिकेत तिने बालकलाकार म्हणून काम केले होते. इतकेच नव्हे तर, तिने अनेक जाहिरातीमध्ये ही काम केले आहे.

त्याचबरोबर ती जेव्हा तिचे शिक्षण पूर्ण करत असताना मॉडेलिंग देखील केले आहे. सुनैना छोट्या पडद्यावर पदार्पण करण्याअगोदर तिने साऊथ चित्रपटही काम केले आहे. अंजली भाभी हे पात्र अनेकांच्या आवडीचे पात्र आहे. त्यांचा मालिकेतील समजुतदारपणा अनेक लोकांना आवडणार आहे.

महत्वाच्या बातम्या
द्रविड-सचिनच्या मुलानंतर ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूच्या मुलानं गाजवलं मैदान, शतक ठोकत संघाला मिळवून दिला विजय
मोठी बातमी! नितेश राणेंनी हायकोर्टातील जामीन याचिका घेतली मागे; चौकशीला जाणार सामोर
करीना कपूरने ट्विंकल खन्नासमोर केला मोठा खुलासा, म्हणाली, अक्षय कुमारने सैफ अली खानला माझ्यासोबत..
मोठी बातमी! नितेश राणेंनी हायकोर्टातील जामीन याचिका घेतली मागे; चौकशीला जाणार सामोर

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now