Share

tanaji sawant : आरोग्यमंत्र्यांना ‘ओमिक्रॉन’ नावंही घेता येईना; सर्वांसमोर डोकं खाजवत म्हणाले…

tanaji sawant

tanaji sawant on omicron  | कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसून येत आहे. चीनसह आणखी काही देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट बीएफ ७ ची अनेकांना लागण होत आहे. त्यामुळे भारतातही या व्हेरिएंटबाबत चिंता व्यक्ती केली आहे.

गुजरात आणि ओडिशामध्ये प्रत्येकी २-२ या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहे. महाराष्ट्र सरकारही यावर चर्चा करत असून त्यांनी महत्वाच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आता बुधवारी नागपूरमध्ये एक आढावा बैठक घेतली होती.

नागपूरमध्ये झालेल्या बैठकीनंतर तानाजी सावंत यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये तानाजी सावंत यांना त्या व्हेरिएंटचे नीट नावही घेता येत नसल्याचे दिसून आले. पत्रकारांसमोरच तानाजी सावंतांना ओमिक्रॉन या शब्दाची आठवण मागे उभे असलेल्या एका अधिकाऱ्याने करुन दिली आहे.

चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या बीएफ ७ या व्हेरिएंटबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्यांना ओमिक्रॉनचा उल्लेख एमिक्रॉन असा केला. त्यानंतर तानाजी सावंत यांचा उच्चार चुकत असल्याचे लक्षात येताच मागे असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांना बरोबर उच्चार सांगितला.

तानाजी सावंत हे डोकं खाजवत प्रतिक्रिया देत होते. ते म्हणाले की, याला अजिबात घाबरण्याची गरज नाही. आपला जो एमिक्रॉन… असं बोलत असताना आपण चुकतोय असं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी देहबोलीतून मागे उभे असलेल्या अधिकाऱ्याला याबाबत विचारलं. त्यावेळी मागून अधिकाऱ्यांनी ओमिक्रॉन नाव आहे असं सांगितलं.

तसेच यावर बोलताना ते म्हणाले की, घाबरुन जाण्याचं काहीच कारण नाही. कारण मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आलेले आहे. आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा आरोग्य, कोरोना संदर्भातील टीम सर्वजण तयारीमध्ये आहे. दोन दिवसांत आमच्याशी संपर्क साधा आणि सुविधा पुरवू असे आम्ही सर्वांना कळवलं आहे, असे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.

टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रीटमेंट, आणि व्हॅक्सिनेशन या चार स्टेप आम्ही कोरोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी करत आहोत. ९५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचे दोन डोस पुर्ण झाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या बातम्या आल्या तर घाबरण्याचं कारण नाही. प्रशासन आणि शासन सतर्क आहे, असेही तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
corona : कोरोनाची अचूक भविष्यवाणी करणाऱ्या IIT कानपूरच्या प्राध्यापकाचे मोठे वक्तव्य; म्हणाले, भारतात लाॅकडाऊन…
BJP : भाजपच्या फायटर आमदार मुक्ता टिळक यांचं ५९ व्या वर्षी निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
shivsena  : एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, संजय राऊतांना जामीन मिळवून देणाऱ्या नेत्यालाच घेतलं आपल्या गटात

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now