Share

“बाळासाहेबांमा अन् वाजपेयींना मैदान भरलं नाही, मी ७ लाखांची गर्दी जमवली”; तानाजी सावंतांची गर्वाची दर्पोक्ती

Tanaji Sawant: महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज काहीतरी नवीन घडताना दिसत आहे. नुकतेच मंत्री तानाजी सावंत यांनी एक वक्तव्य केले आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेतील शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरू आहे. त्याचवेळी आता तानाजी सावंत यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत खळबळजनक विधान केले आहे.

तानाजी सावंत म्हणाले की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पंढरपूरच्या चंद्रभागा मैदानावर अनेक सभा झाल्या. पण, या सर्वांना गर्दी जमवता आली नाही, तिथं सावंत बंधूंनी सात लाखांची गर्दी जमवून दाखवली.

२०१८मध्ये पंढरपूरच्या चंद्रभागा मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. अडवाणीजी यांच्याही सभांना तेवढी गर्दी झाली नाही. ती किमया या पंढरीच्या नगरीमध्ये सावंत बंधूंनी २०१७-१८ मध्ये करून दाखवली. सात लाख लोकांचा मेळावा भरवून करून दाखवली, अस सावंत म्हणाले.

या भेटीबाबत बोलताना सावंत म्हणाले की, जे बाळासाहेब करू शकले नाहीत ते सावंत बंधूंनी पंढरपूरमध्ये केले. दुसरीकडे, सोलापूरच्या पालकमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यात वाद होण्याची चिन्हे आहेत.

तानाजी सावंत यांनी दावा केला आहे की, ‘मी सोलापूरचे पालकमंत्री पद मागत होतो, मात्र मला धाराशिव आणि परभणीचे पालकमंत्री करण्यात आले. मला याचं खूप वाईट वाटलं. तरीही काहीही चुकीचे नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मला सोलापूरचे पालकमंत्रीपद देऊ शकतील, अशी आशा आहे.

यादरम्यान, तानाजी सावंत हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. या आधीही त्यांनी अशा प्रकारची अनेक वक्तव्य केली आहे. आता तर त्यांनी स्वतः ची तुलना बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवणी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची केली आहे. सावंत यांना या वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातून तीव्र टीकेला सामोरे जावे लागू शकते.

म्हत्वाच्या बातम्या –
उद्धव ठाकरेंच्या गंभीर इशाऱ्यानंतर नरमली काॅंग्रेस; सावरकर मुद्यावर आता घेणार ‘ही’ भूमिका
मराठी तरुणाचा जगभरात डंका! मुंबई ते लंडन बाईकवरुन प्रवास करणार, २४ देश ३ खंड पालथे घालणा
ठाकरे सरकार पाडण्याचं सगळं कारस्थान फडणवीसांचच; शिंदे गटातील बड्या नेत्याचा गौप्यस्फोट, अख्खा प्लॅनच सांगीतला

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now