Tanaji Sawant: महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांनी एक मोठं विधान केलं आहे. ज्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महाराष्ट्रात सरकार बदलल्याचा दावा केला आहे. जून २०२२मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदारांनी बंड केले. ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस युतीचे सरकार पडले. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि भाजपच्या युती झाली आणि नवे सरकार स्थापन झाले.
तानाजी सावंत म्हणाले, आमच्या (शिंदे गटाचे नेते) आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठका झाल्या…’. मी आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांत १०० ते १५० सभा घेतल्या. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार शिवसेना आणि भाजपने उस्मानाबाद जिल्हा परिषदेची निवडणूक एकत्र लढवली आणि येथूनच युतीला सुरुवात झाली.
त्यांनीच पहिल्यांदा मातोश्रीवर जाऊन बंडाचा बिगुल वाजवला, असे सावंत म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करणे म्हणजे शिवसेना-भाजप युतीला मतदान करणाऱ्या राज्यातील १२ कोटी जनतेचा अपमान असल्याचेही सावंत म्हणाले.
सावंत म्हणाले, या दोन वर्षांच्या कालावधीत मी विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांना भेटलो. मी त्यांना सर्व काही समजावून सांगितले आणि त्यांचे मत बदलले… फडणवीसांच्या आदेशावरून मी पहिल्यांदा बंड केले, हेच सत्य आहे.
सावंत यांनी सत्ताबदलात फडणवीस यांचा हात असल्याचा सांगितल्याने यापूर्वी फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर संशय निर्माण झाला आहे. तसेच, सरकारला कोंडीत पकडण्याची संधी मिळाली आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक नेतेमंडळी यावर प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे तोंड भरून कौतुक केले. तर, २०१९साली नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजप सेना लोकांना बहुमत दिले असतानाही आमच्या युतीत मिठाचा खडा महाराष्ट्राचे जाणते राजे या नावाने भारतभर ओळखल्या जाणाऱ्यांनी टाकला. असे म्हणत तानाजी सावंत यांनी शरद पवारांवर नाव न घेता टीकास्त्र सोडले.
म्हत्वाच्या बातम्या –