Share

कोहलीपेक्षा वयाने लहान तरीही घेतली क्रिकेटमधून निवृत्ती, म्हणाला, कृपया आजपासून…

cricket

बांगलादेशच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार तमीम इक्बालने ज्या वयात बाकीचे क्रिकेटर फॉर्ममध्ये आहेत आणि अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी प्रयत्न करत आहेत त्या वयात T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. अवघ्या 33 वर्षांच्या तमीमच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

त्याने यापूर्वी 6 महिन्यांसाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून ब्रेक घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आपल्या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तो भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीपेक्षा जवळपास 5 महिन्यांनी लहान आहे.

त्याने आपल्या फेसबुक पेजवर दोन ओळींचा संदेश लिहून या निर्णयाची माहिती दिली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर, तमिमने बांगला भाषेतील त्याच्या अधिकृत फेसबुक पेजवर लिहिले, “कृपया आजपासून T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. तुम्हा सर्वांचे आभार.’

त्याला वनडे आणि कसोटीवर लक्ष केंद्रित करायचे आहे, त्यामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तमिमने 27 जानेवारीला T20I मधून सहा महिन्यांचा ब्रेक घेतला आणि T20 वर्ल्ड कपही खेळला नाही. मात्र या काळात तो देशांतर्गत टी-२० स्पर्धा खेळला.

तमिमने यापूर्वी सांगितले होते की, सहा महिन्यांची मुदत संपण्यापूर्वी तो त्याच्या T20I क्रिकेटच्या भविष्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करेल. तमिमच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 78 T20 सामने खेळले आणि 24.08 च्या सरासरीने आणि 117.2 च्या स्ट्राइक-रेटने 1758 धावा केल्या ज्यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे.

विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी झाला होता, तर तमिमचा जन्म २० मार्च १९८९ रोजी झाला होता. त्याच्या या निर्णयाने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. तमिम हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे यात काहीच शंका नाही. त्याने अनेकवेळा संघासाठी महत्वाची कामगिरी बजावली आहे.

महत्वाच्या बातम्या
श्रीलंकेमधील राजपक्षे कुटुंबाची सत्ता उलथवून टाकण्यामागे आहेत ‘हे’ चार तरुण, ९ तारखेचा केला वापर
पूजेसाठी अगरबत्ती पेटवताच गॅस सिलेंडरचा झाला स्फोट; धक्कादायक घटनेचे फोटो व्हायरल
शिंदे गटात सामील होणार की शिवसेनेतच राहणार? खासदार संजय मंडलिकांनी दिले संकेत
कोकणातील बड्या नेत्याचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा; गंभीर आरोप करत म्हणाले शिवसेनाप्रमुखांनी…

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now