पेट्रोलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे आता अनेकजण इलेक्ट्रिक कार आणि स्कूटरकडे वळत आहे. सरकारनेही इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण या इलेक्ट्रिक स्कूटरबाबतही अनेक धक्कदायक घटना समोर येत आहे.
बीडमध्य एका माणसाने आपली ओला इलेक्ट्रिक स्कूटर अचानक बंद पडल्यामुळे स्कूटरला गाढवाला बांधून निषेध केला होता. असे असतानाच आता तामिळनाडूमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या स्कूटरची चार्जिंग संपल्यामुळे तिच्यावर पेट्रोल टाकून ती जाळली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पृथ्वीराज गोपीनाथन असे त्या वक्तीचे नाव आहे. त्या व्यक्तीने आपल्या Ola S1 Pro या स्कूटरवर पेट्रोल टाकून आग लावली. संबंधित घटना ही तामिळनाडूच्या अंबुर गावात घडली आहे. या घटनेची तिथल्या परीसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे ही ई-बाईक १८१ किलोमीटर अंतर कापेल असा कंपनीचा दावा केला होता. असे असताना ५० ते ६० किलोमीटर चालवल्यानंतर या स्कूटरची बॅटरी संपत होती. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने स्कूटरच पेट्रोल टाकले आणि तिला पेटवून दिले.
त्यावेळी स्कूटरची बॅटरी संपली होती. त्यामुळे त्याने कस्टमर केअरशी संपर्क साधला होता. पण ते फक्त संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच मदतीसाठी कोणाला तरी पाठवू शकतात, असे म्हणत होते. तो व्यक्ती कडक उन्हात रस्त्यातच अडकला होता. त्याला दुसरा कोणताच पर्याय नव्हता. त्यामुळे त्याने पेट्रोल टाकून थेट स्कूटरच पेटवून दिली.
पृथ्वीराजने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, मी माझ्या सहाय्यकाला दोन लिटर पेट्रोल विकत घेण्यास सांगितले, जे मी ई-बाईकवर टाकले आणि ती पेटवली. मी व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही मिनिटांत, एका ओलाच्या कर्मचाऱ्याने मला कॉल केला आणि मीडियाला कोणतीही मुलाखत न देण्याची विनंती केली. तसेच ई-बाईक बदलण्याचेही आश्वासन दिले.
पुढे तो म्हणाला की, मी त्याला मोकळेपणाने सांगितले की मी बाईक पेटवताच कंपनीचे आणि माझे नाते संपले आहे. पण तो म्हणाला की, एक टीम आधीच नवीन ई-बाईक घेऊन अंबुरमधील त्याच्या घरी रवाना झाली आहे आणि आज रात्री बाईक तुमच्या घरी पोहचून जाईल. पृथ्वीराजने हे इलेक्ट्रिक स्कूटर जानेवारी महिन्यात खरेदी केले होते.
महत्वाच्या बातम्या-
राजकारणात खळबळ! मराठा क्रांती मोर्चाचा आक्रमक पवित्रा; ‘या’ मागणीसाठी थेट मंत्रालयात धडक
ठाकरेंनी मोदींना प्रत्यूत्तर देताच फडणवीस प्रचंड संतापले; लागोपाठ तीन ट्विट करत म्हणाले…
किळसवाणे! ३० वर्षांपासून रेस्टॉरंटच्या टॉयलेटमध्ये बनवला जातोय समोसा, अधिकाऱ्यांनाही बसला धक्का