शोभायात्रांदरम्यान दगडफेक व जाळपोळीच्या घटनांमुळे तणाव निर्माण झाला होता. त्यावर तीव्र चिंता व्यक्त होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली हिंसाचारावर वक्तव्य केले आहे. तसेच शहा या घटनेनंतर अधिकाऱ्यांना काही कडक सूचनादेखील दिल्या आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी आतापर्यंत 22 जणांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे या घटनेवरून आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. दंगलखोरांवर अशी कडक कारवाई करा, अशा कडक सूचना शहा यांनी दिल्या आहेत. शहा यांनी फोनवरून पोलीस आयुक्तांना सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत बोलताना ‘या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्याचे आदेशही शहा यांनी दिले आहे. दिल्लीत झालेल्या हिंसाचारावरून देशभरात राजकरण तापलं आहे. या घटनेबाबत केंद्रातील विद्यमान सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्या मौनावर विरोधी पक्ष सवाल करत आहेत.
याचाच धागा पकडत आता भाजपकडूनही उत्तर दिले जात आहे. मिळालेल्या महितीनुसार, अमित शाह यांनी दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की, दंगलखोरांवर अशी कडक कारवाई करा की, दिल्लीत पुन्हा अशी दंगल आणि हिंसाचार घडला नाही पाहिजे.
दरम्यान, तर दुसरीकडे दिल्लीतील परिस्थितीबद्दल बोलताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी सुरक्षेची जबाबदारी केंद्रावर टाकत दिल्लीची सुरक्षा केंद्राच्या हातात असल्याचं म्हटलंय आहे.