Share

मी देशाच्या बड्या उद्योगपतीच्या पत्नीसोबत रात्र घालवलीये; तहसीन पुनावालाचा खळबळजनक खुलासा

तहसीन पूनावाला एकता कपूरच्या ‘लॉक-अप’ या रिअॅलिटी शोमधून बाहेर पडला आहे. मात्र, बाहेर जाताना त्याने असा खुलासा केला की, ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. कमी मते मिळाल्यामुळे कंगनाने तहसीनला तिच्या तुरुंगातून बाहेर जाण्यास सांगितले होते. (tahseen ralation with business man wife)

तसेच यावेळी तहसीनला असेही सांगितले की, जर तो शोमधून बाहेर पडत आहे, तर तो एका स्पर्धकाला शोमधून बाहेर पडण्यापासून वाचवू शकतो, पण त्यासाठी त्याला किंमत मोजावी लागेल. ती किंमत अशी होती की तहसीनला त्याचे एक सिक्रेट जगासमोर उघड करावे लागेल आणि त्या बदल्यात तो एका स्पर्धकाला वाचवू शकेल. ही अट मान्य करून तहसीनने सायशाला वाचवले.

तहसीनने सांगितले की, त्याला देशातील एका मोठ्या उद्योगपतीने आपल्या पत्नीसोबत एक रात्र घालवण्यास सांगितले होते. आणि यासोबत त्याच्या काही अटी आणि शर्ती होत्या. तेहसीनचे हे रहस्य ऐकून कंगना राणावतसह सर्वच स्पर्धकांना धक्का बसला आहे.

तहसीनने पुढे सांगितले की, या कामासाठी देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतीने संपूर्ण नाईट क्लब बुक केला होता आणि जेव्हा तहसीन त्याच्या पत्नीसोबत वेळ घालवत होता, तेव्हा व्यापारी हे सर्व पाहत होता. त्याची एकच अट होती की तो तहसीनला त्याच्या पत्नीसोबत वेळ घालवताना बघेन.

तेहसीनचे हे शब्द ऐकून कंगनाने त्याला विचारले, तुला ही गोष्ट आवडली का? तेव्हा तहसीन म्हणाला, हो. पण माझ्याही काही अटी होत्या. मी त्या उद्योगपतीला सांगितले की तो हे दुरून पाहील. त्यांच्या जवळ येणार नाही किंवा त्यांना अजिबात स्पर्श करणार नाही. तहसीनने या उद्योगपतीचे नाव उघड केलेले नाही.

तहसीनच्या या खुलाशानंतर कंगना राणावतने त्याला विचारले की, त्याच्या पत्नीला याबद्दल माहिती आहे का? तेव्हा तहसीनने सांगितले की, त्याच्या पत्नीला याविषयी सर्व काही माहिती आहे आणि जेव्हा ही गोष्ट घडली तेव्हा त्यांचे लग्न झालेले नव्हते.

तसेच जेव्हा तो त्याच्या पत्नीला भेटला आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली, तेव्हा त्याने सुरुवातीपासूनच उद्योपतीच्या पत्नीसोबत घडलेल्या आपल्या या सांगितले होत्या. हा संपूर्ण किस्सा ऐकल्यानंतर कंगनाने तहसीनला सांगितले की, तो जेलसाठी नव्हे तर सायशासाठी हिरो आहे, परंतु आता त्याला हे लॉकअप सोडावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
शाहरूखच्या पठाण सिनेमाचे सलमानने केले तोंडभरून कौतूक; शाहरूखला फोन करून म्हणाला टेंशन घेऊ नकोस…
कश्मीरी पंडीतांच्या हत्याकांडावेळी भाजपचे ८५ खासदार काय करत होते? त्यांच्या पाठींब्यावर सरकार होते
रोहित, विराटपेक्षाही श्रीमंत आहे ‘हा’ खेळाडू; एका आठवड्यात कमावतो तब्बल १६ कोटी

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now