Mahadevi Elephant Kolhapur: महादेवी हत्तीण वनतारामधून नांदणीला परत येईल ? कोल्हापुरात हालचालींना वेग

Mahadevi Elephant Kolhapur : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील नांदणी (Nandani) मठातील महादेवी हत्तीणी (Mahadevi Elephant Kolhapur)ला गुजरातमधील वनतारामध्ये (Vantara Elephant) हलवण्यात आलं होतं. यावेळी ग्रामस्थांनी हत्तीणीला भावुक निरोप दिला आणि त्याच्या मिरवणुकीत सहभागी झाले. महादेवी हत्तीणीला परत नांदणी मठात आणण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर स्वाक्षरी मोहीम राबवली. सतेज पाटील (Satej Patil) आणि राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या … Read more

Raju Shetti on Rajesh Kshirsagar : माझी 500 एकर जमीन तुमच्या नावे करण्यासाठी उद्या 12 वाजता बिंदू चौकात येतोय; राजू शेट्टींचे क्षीरसागरांना थेट ओपन चॅलेंज

Raju Shetti on Rajesh Kshirsagar: शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा देताना केलेल्या वक्तव्यामुळे राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) अडचणीत सापडले आहेत. कारण, त्यांनी राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्याकडे तब्बल 500 एकर जमीन असल्याचा दावा केला. या आरोपावर प्रत्युत्तर देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष आणि माजी खासदार शेट्टी यांनी थेट खुलं आव्हान दिलं आहे की, “त्या … Read more

Raju Shetti on Devendra Fadnavis: ‘तुमच्या कर्माची फळ जनता भोगतेय’ , सरकारी कंत्राटदाराच्या आत्महत्येनंतर राजू शेट्टींचा फडणवीसांवर घणाघात

Raju Shetti on Devendra Fadnavis: सांगली (Sangli) जिल्ह्यातील वाळवा (Valva) तालुक्यातील तांदुळवाडी (Tandulwadi) गावात हर्षल पाटील (Harshal Patil) या ३५ वर्षांच्या सरकारी ठेकेदाराने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जलजीवन मिशन (Jal Jeevan Mission) अंतर्गत झालेल्या कामाचे पैसे वेळेवर न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या हर्षल यांनी गळफास घेतला. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली … Read more

हातकणंगलेत आता तिरंगी लढत! ठाकरेंनी टाकला डाव, आता राजू शेट्टी यांचे टेन्शन वाढणार…

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये हातकणंगले मतदार संघात विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यानंतर मात्र भाजपचे मित्रपक्ष असलेले ताराराणी आघाडीचे आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी नाराज होऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल … Read more

raju shetti : …तर मी विरोधकांसोबत जाणार, राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं, राजकीय समीकरण बदलणार

raju shetti : स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख नेते राजू शेट्टी हे राजकारणातील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांसाठी नेहमीच ते तत्पर असतात. शेतकऱ्यांसाठी अनेकदा शेट्टी यांनी लढा देत राज्य सरकारला देखील धारेवर धरले आहे. आता पुन्हा एकदा शेट्टी हे आक्रमक झाल्याच पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा फटका आता ऊस … Read more

‘…तर भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होईल’; राजू शेट्टींचा केंद्रावर निशाणा

सध्या श्रीलंका आर्थिक अडचणीत आहे. तिथे प्रचंड महागाई झाली असून, लोकांना जीवन जगणं देखील अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत तिथे रासायनिक खतांच्या किंमती देखील प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे लोक रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक पद्धतीने शेती करत आहेत. नैसर्गिक पद्धतीने शेती केल्यामुळे उत्पादन कमी झाले आहे, याचा अधिक फटका श्रीलंकेला बसला आहे. तिथे अन्नधान्याचे संकट निर्माण झाले … Read more

‘भोंगे काढल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत असतील तर मी ६ तास नमाज अन् हनुमान चालिसा म्हणेल’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. हनुमान चालिसा आणि भोंगे यावरून सध्या महाराष्ट्रात जो वाद सुरू आहे, यामध्ये आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उडी घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेसंदर्भात टोला … Read more

राजू शेट्टींचा ‘एकला चलो’चा नारा; महाविकास आघाडीला ठोकला रामराम, केली मोठी घोषणा

अखेर स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केली आहे. स्वाभीमानीचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. राजू शेट्टी यांच्या या निर्णयामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. तसेच गेल्या दिवसांपासून राजू शेट्टी महाविकास आघाडी सरकारला सोडचिठ्ठी देणार असल्याचं म्हटलं जात होतं. काही दिवसांपूर्वीच … Read more

महाविकास आघाडीला धक्का! ‘हा’ प्रमुख पक्ष आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत

mahavikas aghadi

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून पक्षात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद-विवाद होताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षातून लवकरच बाहेर पडण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात देखील वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. नुकत्याच एबीपी माझाला … Read more

“शेतकऱ्यांना दिवसा वीज न दिल्यास जनआंदोलन उभे करून ठाकरे सरकारला गुडघे टेकायला लावणार”

स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतक-यांना दिवसा दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी चांगलीच आक्रमक झाली आहे. अशातच वितरण कंपनीचे सर्व घोटाळे बाहेर काढणार असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, सरकार फक्त आश्वासन देत आहे. त्यामुळे सरकारवर आम्ही शंभर टक्के … Read more