MNS Traffic March : बाराच्या आत ट्रक रोडवर दिसले तर ते फोडून टाकू, अविनाश जाधवांचा कडक इशारा

MNS Traffic March : ठाणे (Thane) शहरातील वाहतुकीची स्थिती गंभीर बनत चालली आहे. जड आणि अवजड वाहनांची बेकायदेशीर वाहतूक, तसेच प्रशासनाची निष्क्रियता पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पुन्हा एकदा ठाणे महापालिकेसमोर आक्रमक भूमिका घेत आहे. येत्या 20 सप्टेंबर रोजी मनसेकडून (MNS) ठाण्यात ट्रॅफिक मोर्चा (Traffic March Morcha) काढण्यात येणार असून, हा मोर्चा मनसे नेते अविनाश … Read more

Rohit Pawar : मराठी विरुद्ध अमराठी वाद निर्माण केलाय, राज ठाकरेंना आता भाजपचा चेहरा कळला असेल; भाजपच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

Rohit Pawar :  मीरा-भाईंदर (Mira-Bhayandar) शहरात सध्या मराठी अस्मिता, मराठी भाषा आणि स्थानिक मराठी जनतेवरील अन्याय या मुद्द्यांवर वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) व शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वतीने शहरात मोर्चा आयोजित करण्यात आला. मात्र पोलीस प्रशासन (Police Department) याने मोर्चाला परवानगी नाकारली असून, मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता, … Read more

MNS Marathi Morcha in Mira bhayandar : मीरा-भाईंदरमध्ये बंदी झुगारली, मनसेचा मराठी मोर्चा पोलिसांची नाकेबंदी तोडून रोडवर धडकलाच!

MNS Marathi Morcha in Mira bhayandar:  मीरा भाईंदर (Mira Bhayandar) परिसरात मराठी भाषेच्या सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना (Shiv Sena) आणि मराठी एकीकरण समिती (Marathi Ekikaran Samiti) यांच्या वतीने नियोजित मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील वातावरण चिघळले होते. काल रात्रीपासूनच पोलिसांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. … Read more

Devendra Fadnavis : मीरा भाईंदर मोर्चा रोखण्यामागे कोणता गुप्त कट? मुख्यमंत्री आक्रमक, पोलिसांना कडक निर्देश

Devendra Fadnavis :  मीरा भाईंदर (Mira Bhayandar) येथे मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि इतर मराठी संघटनांनी आयोजित केलेल्या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. परिणामी वातावरण चिघळले आणि आंदोलकांमध्ये असंतोष पसरला. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis – BJP) यांनी याप्रकरणात थेट लक्ष घालत राज्याचे पोलिस महासंचालक (Director General of Police … Read more

Sandeep Deshpande : “मेहता बिहतांनी चड्डीत राहावं, मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच वाजवू”; देशपांडेंचा भाजप आमदाराला इशारा

Sandeep Deshpande : मुंबईत (Mumbai) सध्या मराठी-अमराठी वाद पुन्हा एकदा चिघळलेला असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी भाजप (BJP) आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांच्यावर खरमरीत शब्दांत निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी ‘एक्स’ (Ex – Twitter) वर पोस्ट करत म्हटलं, “बेपारी आहात, बेपार करा. आमचे बाप बनण्याचा … Read more

Mira Bhayandar morcha against MNS: मीरा-भाईंदरमध्ये मनसेविरोधात व्यापाऱ्यांचा मोर्चा, भाजपने रसद पुरवल्याचा आरोप, नाराज पदाधिकाऱ्यांचा थेट मनसेत प्रवेश

Mira Bhayandar morcha against MNS : मीरा-भाईंदर (Mira-Bhayandar) परिसरात अमराठी दुकानदारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांकडून झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. मिरारोड (Mira Road) येथील सेवेन स्कूलपासून पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड (Prakash Gaikwad) यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला. या घटनेनंतर स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मनसेचे ठाणे-पालघर … Read more

MNS Marathi Language: दुकानदाराने माफी मागितली पण भाजपने मोर्चा काढायला लावला; अविनाश जाधवांचा गंभीर आरोप

MNS Marathi Language: मीरा रोड (Mira Road) येथील शांती पार्क परिसरातील ‘जोधपूर स्वीट्स अ‍ॅन्ड नमकीन’ या दुकानात घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण मीरा-भाईंदर (Mira-Bhayandar) शहरातील व्यापाऱ्यांनी आज आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून तीव्र निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी दुकान मालकाला कानाखाली लगावल्याच्या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे … Read more

Mira Bhayandar News: मराठी-अमराठी वाद चिघळला, मनसेविरोधात अमराठी व्यावसायिक एकत्र, मीरा-भाईंदर बंदचा इशारा

Mira Bhayandar News:  मीरा-भाईंदर (Mira-Bhayandar) परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी एका अमराठी दुकानदाराला मारहाण केल्याच्या घटनेने राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेनंतर स्थानिक व्यापाऱ्यांनी निषेध म्हणून आपली दुकाने बंद ठेवली आणि मोर्चा काढला. यावर मनसेचे ठाणे-पालघर विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी भाजपच्या (BJP) स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मोर्चा हा व्यापाऱ्यांचा … Read more

बीडच्या शेतकरीपुत्राने रचला इतिहास; राष्ट्रकुल स्पर्धेत पटकावले रौप्यपदक

प्रियांकाच्या 10,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदकानंतर, स्टीपलचेसर अविनाश साबळे याने 3000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले आहे. तो मुळचा बीडचा आहे. 13 सप्टेंबर 1994 रोजी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा गावात जन्मलेल्या अविनाश साबळेने राष्ट्रीय विक्रम मोडून हे पदक जिंकले. त्याने 8:11:20 अशी वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. राष्ट्रकुल 2022 च्या नवव्या दिवशी भारताचे हे दुसरे … Read more

राज ठाकरें पाठोपाठ आता मनसैनिकही आक्रमक! प्लॅन बी देखील ठरला; जाणून घ्या…

raj

१ मे रोजी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण दिले होते. या भाषणात त्यांनी मशिदींवरील भोंग्यावर पुन्हा आक्रमक भूमिका घेतलेली दिसली.  राज ठाकरे यांनी ‘३ मे नंतरही मशिदींमधून लाऊडस्पीकर काढले नाही, तर ४ मे पासून मनसे कार्यकर्ते ठिकठिकाणी मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसाचे पठण करतील,’ असा अल्टिमेटम दिला. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या सभेसाठी काही … Read more