घड्याळ हा माणसाच्या जीवनामधला अविभाज्य भाग बनला आहे. घड्याळ बनवण्याऱ्या कंपन्या वेगळ्या असू शकतात, त्याची डिझाइन वेगळी असू शकते पण टाइम सगळीकडे एकच असतो. पण काय होईल जेव्हा घडाळ्यात १२ वाजणार नाही. आश्चर्य वाटलं ना, पण एक घड्याळ आहे, ज्यामध्ये १२ वाजत नाही. (switzerland watch without 12 digit)
सोलोथर्न हे स्वित्झर्लंडमधील एक शहर आहे. या शहरात एका चौकात एक घड्याळ बसवले आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे या घड्याळात १२ ऐवजी फक्त ११ च अंक आहेत. याशिवाय इथे इतर अनेक घड्याळं आहेत, ज्यात १२ कधीच वाजत नाही, कारण त्यामध्ये १२ हा अंकच नसतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शहरातील लोकांना ११ नंबर खूप आवडतो. इथल्या सर्व गोष्टींची रचना ११ क्रमांकाभोवती फिरते यावरून याचा अंदाज लावता येतो. विशेष म्हणजे या शहरात चर्चची संख्या केवळ ११ आहे. याशिवाय म्युझियम, ऐतिहासिक धबधबे आणि टॉवर्स सुद्धा ११ च आहेत.
इतकेच नाही लोकांना ११ नंबर इतका आवडतो की ते त्यांचा ११ वा वाढदिवसही मोठ्या थाटामाटात साजरा करतात. रंजक गोष्ट म्हणजे या प्रसंगी दिलेल्या भेटवस्तू देखील ११ क्रमांकाशी संबंधित आहेत. इथे ११ क्रमांकाशी संबंधित अनेक गोष्टी सुद्धा आहेत.
येथील लोक ११ क्रमांकाला खूप शुभ मानतात. यामागे खूप जुनी समज आहे. असे म्हटले जाते की एके काळी सोलोथर्नचे लोक खूप कठोर परिश्रम करायचे, परंतु असे असूनही, त्यांच्या जीवनात समस्या होत्या. काही वेळाने टेकड्यांवरून एल्फ आला आणि तो लोकांना प्रोत्साहन देऊ लागला. एल्फच्या आगमनाने तिथल्या लोकांच्या जीवनातील समस्या कमी झाल्या.
जर्मनीतील पौराणिक कथांमध्ये एल्फची कथा ऐकायला मिळते. इथल्या लोकांचा असा विश्वास आहे की त्यांच्याकडे अलौकिक शक्ती आहे. जर्मन भाषेत एल्फचा अर्थ ११ आहे. म्हणूनच सोलोथर्नच्या लोकांनी एल्फला ११ क्रमांकाशी जोडले आणि तेव्हापासून इथले लोक ११ नंबरला खूप महत्त्व देऊ लागले.
महत्वाच्या बातम्या-
..तर महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला करणार नपुंसक, सरकारचा मोठा निर्णय
धक्कादायक! पतीसह सांगलीतील दोन मुलं डोळ्यादेखत समुद्रात गेली वाहून, कुटुंबावर शोककळा
VIDEO: राखी सावंतची नौटंकी पाहून नेटकरी संतापले, फेक बेबी बंप घालून म्हणाली, मी मसिहाला..