लोकार्पणानंतर दुपारी 2 वाजता त्यांची सभा झाली. याचबरोबर नरेंद्र मोदी सभास्थळी दाखल होताच त्यांचा तुकोबांची पगडी, उपरणे आणि तुळशीची माळ घालून नितीन महाराज मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिकृती देण्यात आली.
यावेळी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई यांसह संतवाणी आणि अभंगांची ओवी मोदींनी गायली. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांच्या जीवनात तुकाराम महाराजांसारख्या संतांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत जेव्हा वीर सावरकर यांना शिक्षा झाली, तेव्हा तुरूंगात ते तुकाराम महाराजांचे अभंग गात असत.’
पुढे मोदी म्हणाले, ‘संत भिन्न परिस्थितीत समजाला गती देण्यासाठी पुढे येतात. शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांच्या जीवनात तुकाराम महाराजांसारख्या संतानी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकांना शिक्षा झाली. तेव्हा ते तुरुंगात तुकाराम महाराजांचे अभंग गात असत.’
‘वेगवेगळा कालखंड वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. मात्र या सर्वांसाठी संत तुकाराम यांची वाणी आणि उर्जा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेली आहे,’ असं मोदी म्हणाले. पुढे म्हणाले, ‘आज देश सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मंत्रावर चालतो आहे. सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ कोणताही भेदभाव न करता सर्वांनाच मिळतोय. देश महिला सबलीकरणासाठी प्रयत्न केला जातोय.’
दरम्यान, ‘पंढरपूरची वारी ही संधीच्या समानतेचं प्रतिक आहे. संत तुकाराम महाराज म्हणायचे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा’, म्हणेज समजात शेवटी बसलेल्या व्यक्तीला आपले समजून त्यांचे कल्याण करणे हेच संताचे लक्ष्य आहे. हाच देशासाठी संकल्प आहे. हाच संकल्प घेऊन देश पुढे जातोय, असं मोदी म्हणाले.