बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. कधी ती तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत येत असते, तर कधी ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत येत असते. (swara bhaskar shocking tweet about cab driver)
तसेच स्वराबाबत बोलायचे झाले, तर ती अनेकदा तिच्या चाहत्यांसोबत तिच्या व्यवसायिक आयुष्यासोबतच खाजगी गोष्टीही शेअर करते. पण अलीकडेच अभिनेत्रीने चाहत्यांना तिच्या सामानाच्या चोरीबद्दल सांगितले आहे. तिने आपल्या एका ट्विटमध्ये सांगितले की, एक कॅब चालक तिचे सामान घेऊन पळून गेला आहे.
स्वराने तिच्या ट्विटमध्ये कॅब चालकाबद्दल तक्रार केली आहे. अभिनेत्रीने सांगितले की तिने लॉस एंजेलिसमधून काही किराणा सामान खरेदी केले होते, जे कॅब चालक घेऊन पळून गेला. मात्र, आता अनेक यूजर्सनी अभिनेत्रीची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. काही लोक म्हणाले, की हे सर्व तिच्या कर्माचे फळ आहे.
https://twitter.com/ReallySwara/status/1506710608925790208?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1506710608925790208%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fd-31157521641101741893.ampproject.net%2F2203101844000%2Fframe.html
तिच्या एका ट्विटमध्ये उबेरला टॅग करत स्वराने लिहिले की, तुमचा एक ड्रायव्हर त्याच्या कारमधले माझे सर्व किराणा सामान घेऊन पळून गेला आहे. तुमच्याकडे याची तक्रार करण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. ही हरवलेली वस्तू नाही! त्याने माझे सामान चोरले आहे. मला माझे सामान परत मिळेल का?
आता स्वराचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, उबेर, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, ते मोफत वस्तू मिळवण्यासाठी हे करत आहेत. त्याचवेळी दुसर्या यूजरने लिहिले की, उबेरने तिला उत्तर देण्याचे कष्ट घेऊ नये. तिला बिनबुडाचे आरोप करण्याची सवय आहे. दुसर्या वापरकर्त्याने याला कर्माचे फळ म्हटले आहे.
स्वराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आजकाल ती तिच्या आगामी ‘शीरकुर्मा’ या शॉर्ट फिल्मबद्दल चर्चेत आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये तिच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि दिव्या दत्ता यांसारख्या अभिनेत्रीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. फराज आरिफ अन्सारी दिग्दर्शित हा चित्रपट एक प्रेमकथा आहे. याशिवाय ती ‘जहां चार यार’ या चित्रपटातही दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
विचित्र अवस्थेत रस्त्यावर फिरताना दिसला द कपिल शर्मा शो मधील कॉमेडियन, व्हिडीओ झाला व्हायरल
RRR चा राडा! रिलीज होण्यापुर्वीच केली रेकॉर्डतोड कमाई, राजामौलींनी स्वत:चाच रेकॉर्ड मोडला
काश्मिर फाईल्स पाहण्यासाठी आलेल्या महिलांकडून रिक्षावाला घेत नाही पैसै, विवेक अग्निहोत्री म्हणाले..