माजी मिस युनिव्हर्स आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ४७ वर्षांची आहे. पण तिचे अजूनही लग्न झालेले नाही. आता एका मुलाखतीत तिनेच यामागचे कारण सांगितले आहे. ती म्हणते की, माझे लग्न न करण्याचे कारण वेगळे असून त्याचा मी दत्तक घेतलेल्या मुलींशी काहीही संबंध नाही. (sushmita sen talking about marriege)
ट्विक इंडियामध्ये ट्विंकल खन्नाने घेतलेल्या मुलाखतीत सुष्मिताने सांगितले की, सुदैवाने मला माझ्या आयुष्यात खूप चांगली माणसे मिळाली आहेत. पण मी लग्न केले नाही कारण ते नाते लग्नापर्यंत पोहचूच शकले नाही. मी दत्तक घेतलेल्या मुलींचा याच्याशी काहीही संबंध नाही.
सुष्मिताने सांगितले की, जेव्हा तिने रेनीला दत्तक घेतले तेव्हा तिच्या आयुष्यात कोणी नव्हते. नंतर तिच्या आयुष्यात आलेल्यांना मला काय हवं आहे हे त्यांना कळू शकले नाही. तसेच सुष्मिताने असेही सांगितले की, तिची जबाबदारी कोणीही वाटून घ्यावी अशी अपेक्षा नाही. पण कोणीही तिला तिच्या मुलींपासून लांब घेऊन जाऊ नये, असे तिला वाटते.
सुष्मिता म्हणते, माझ्या मुलींनी माझ्या आयुष्यातल्या लोकांना खुल्या हातांनी स्वीकारलं. त्यांनी कधीही कोणाला पाहून पाठ फिरवली नाही. सगळ्यांचा आदर केला. हे खरोखरचं खुप सुंदर आहे. तीन वेळा माझे लग्न होणार होते. पण तिन्ही वेळा देवाने मला वाचवले. माझ्या आयुष्यात किती संकटे आली हे मी सांगू शकत नाही. देवाने माझे रक्षण केले.
सुष्मिता सेनने २००० मध्ये रेनी आणि २०२० मध्ये अलिशाला दत्तक घेतले. तिचे पूर्वीचे नाते रोहमन शॉलसोबत होते, जे तीन वर्षे टिकले आणि २०२१ मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. सुष्मिता सेनच्या आयुष्याविषयी सांगायचे तर, तिने १९९४ मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता.
त्यानंतर १९९६ मध्ये महेश भट्टच्या ‘दस्तक’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने ‘बिवी नं. १’, ‘फिजा’, ‘आँखे’, ‘मैं हूं ना’ आणि ‘मैने प्यार क्यूं किया’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. जवळपास ९ वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर, ती २०२० मध्ये ‘आर्या’ या वेब सीरिजसह परतली. ती आर्याच्या सिजन २ मध्येही दिसली आहे.
महत्वाच्या बातम्या-
फडणवीसांसारख्या हलकट माणसावर स्वप्नातही विश्वास ठेऊ नका; फडणवीसांच्या माजी सहकाऱ्यानेच केला भांडाफोड
१५ दिवसांत एकनाथ शिंदेंच्या चाहत्यांची संख्या झाली तिप्पट; थेट आकडेवारीच आली समोर
‘अण्णा, आशीर्वाद राहू द्या, आदेश देत जा’; मुख्यमंत्री शिंदेंचा थेट अण्णा हजारेंना व्हिडिओ कॉल