Share

६ महिन्यांपूर्वीच झालं होतं सुष्मिता सेनचं ब्रेकअप, स्वत:च सांगितलं होतं ब्रेकअपचं खरं कारण

सुष्मिता सेनचे नाव बॉलिवुडच्या अनेक स्टार्सशी जोडले गेले होते. यामध्ये दिग्दर्शकांपासून ते अभिनेते आणि क्रिकेटपटूंच्या नावांचा समावेश आहे. पण अभिनेत्रीचे नाते कोणाशीही फार काळ टिकू शकले नाही. आता आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी आपण सुष्मिता सेनसोबत रिलेशिपमध्ये असल्याचे म्हटले आहे. (sushmita sen break up 6 month ago)

ललित मोदींनी सोशल मीडियावर जाहीर केले की ते सध्या माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनला डेट करत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की ललित मोदीला डेट करण्यापूर्वी सुष्मिता सेनचे ६ महिन्यांपूर्वीच ब्रेकअप झाले होते. तिच्या ब्रेकअपचे कारण सुद्धा हैराण करणारे होते.

सुष्मिता सेन ललित मोदी यांच्या आधी रोहमन शॉल याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. सुष्मिता सेनने २३ डिसेंबर २०२१ रोजी रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्याचे सोशल मीडियावर एक पोस्ट करुन सांगितले होते. त्याला आता सहा महिने उलटले आहे.

सुष्मिताने पोस्टमध्ये लिहिले होते की, आम्ही मैत्रीपासून सुरुवात केली आणि नेहमीच मित्र राहू. प्रदीर्घ नात्याचा काळ संपला आहे…पण प्रेम अजूनही आहे. यातून तिचे रोहमनसोबत ब्रेकअप झाल्याचे स्पष्ट झाले होते. अभिनेत्रीच्या या पोस्टनंतर अनेक प्रकारच्या बातम्या आल्या. पण नक्की काय झाले हे चाहत्यांना समजू शकले नाही.

त्यानंतर सुष्मिता सेनने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना तिच्या ब्रेकअपवर मौन सोडले. सुष्मिता म्हणाली होती की, जेव्हा एखादी व्यक्ती पब्लिक फिगर असते तेव्हा तिच्याशी निगडित लोकही लोकांच्या नजरेत येतात. ती व्यक्ती तिथे आहे कारण तुम्ही त्याला तिथे आणले आहे. ही गोष्टी त्याच्यासाठीही योग्य नव्हती आणि माझ्यासाठीही. त्यामुळे माझा ब्रेकअप झाला.

दरम्यान, सुष्मिता सेन आणि रोहमनचे नाते त्यांच्या वयातील अंतरामुळेही चर्चेत होते. रोहमन ३० तर सुष्मिता सेन ४६ वर्षांची आहे. म्हणजेच रोहमन वयाने अभिनेत्रीपेक्षा जवळपास १६ वर्षांनी लहान होता. ब्रेकअपनंतरही सुष्मिता आणि रोहमन अनेकदा एकत्र दिसले होते. पण ब्रेकअपच्या सहा महिन्यांनंतर सुष्मिता पुन्हा प्रेमात पडली आहे.

महत्वाच्या बातम्या-
संभाजीनगर नाही औरंगाबादच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नामांतराला दिली स्थगिती
‘सलमानने मला लग्नासाठी विचारलं तर मी नाही म्हणणार नाही’, अभिनेत्रीचं हैराण करणारं वक्तव्य
पुन्हा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत, शिवसेना जिल्हाप्रमुखांचा सूर; राजकीय समीकरण बदलणार

मनोरंजन बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now