Share

ललित आणि सुष्मिताच्या नात्यावर एक्स बॉयफ्रेंडची धक्कादायक प्रतिक्रिया; म्हणाला, मनसोक्त हसून घ्या, कारण…

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन आणि इंडियन प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष ललित मोदी एकमेकांना डेट करत आहेत. ललित मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली आहे. तेव्हापासून त्यांच्या नात्याची सर्वत्र चर्चा रंगली होत्या. (sushmita ex boyfriend on sushmita and lalit modi relation)

ललित मोदी आणि सुष्मिता यांनी त्यांची सुटी मालदीवमध्ये घालवली, तिथून त्यांचे अनेक फोटोही समोर आले. याबाबत सुष्मिताचा भाऊ राजीव सेन यांना विचारले असता ते आश्चर्यचकित झाले. याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

सहा महिन्यांपूर्वीच सुष्मिता सेनचे ब्रेकअप झाले होते. ती अभिनेता रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. डिसेंबर २०२१ मध्ये सुष्मिताने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत आपले ब्रेकअप झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर सुष्मिता आता ललित मोदींसोबत रिलेशनशिपमध्ये आली आहे.

ललित आणि सुष्मिताच्या नात्यावर एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलची प्रतिक्रिया आली आहे. रोहमन शॉलने एक स्टोरी शेअर करत ललित आणि सुष्मिताच्या नात्यावर पोस्ट केली आहे. कोणावरही हसून तुम्हाला बरं वाटतं असेल तर मनसोक्त हसा, कारण अस्वस्थ तो नाहीये, तुम्ही आहात, असे त्याने म्हटले आहे.

ललित मोदी आणि सुष्मिता सेनचे नाते समोर येताच अनेकांनी रोहमनला ट्रोल केले होते. ललित मोदीसाठी सुष्मिता सेनने तुला सोडले असे ट्रोलर्स रोहमनला म्हणत होते. त्यामुळे त्याने ही पोस्ट करत ट्रोलर्सला सुनावले आहे. तसेच ही स्टोरी पोस्ट करुन त्याने एकप्रकारे ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या नात्यालाही पाठिंबा दिला आहे.

रोहमनन शॉलने एका चॅनेलशी संवाद साधला होता. त्यामध्ये त्याला ललित आणि सुष्मिताच्या नात्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला की, प्रेम ही खुप सुंदर गोष्ट आहे. त्यांना आनंदी राहू द्या. जर तिने कोणाला निवडले असेल, तर तिच्यासाठी तोच पात्र असेल.

महत्वाच्या बातम्या-
मी मधमाशीसारखी माणसं गोळा केली, सोडली तर पळताभुई थोडी होईल; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
शिंदे-फडणवीसांच्या ‘त्या’ कृतीवरुन अजित पवार भडकले; शेलक्या शब्दात घेतला समाचार, वाचा काय म्हणाले..
‘फक्त दोनच मुले जन्माला घालण्याच्या कोणत्याही कायद्याचे समर्थन करणार नाही’- असदुद्दीन ओवैसी

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now