उद्धव ठाकरेंवर कडवी टिका करणाऱ्या डॅशींग नेत्या सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

एकीकडे शिवसेना गळती लागली आहे. तर दुसरीकडे पक्षात नवीन नेत्यांचा समावेश देखील होतं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील महिन्यात केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात नेत्यांनी शिंदे गटाला समर्थन दिले आहे.

यामुळे शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे. अशातच एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. कोरेगाव भीमा प्रकरणातील तक्रारदार सुषमा अंधारे या आज शिवसेनेत प्रवेश करणार असून हाती शिवबंधन बांधणार आहेत. अंधारे यांच्या प्रवेशामुळे पुण्यात शिवसेनेला बळ मिळणार असल्याच बोललं जातं आहे.

याचे कारण असे की, सुषमा अंधारे या आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जातात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभा गाजवल्या होत्या. विशेष बाब म्हणजे, सुषमा अंधारे या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक होत्या.

याचबरोबर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांच्या प्रचारासाठी सुषमा अंधारे यांनी सभा घेतली होती. या सभेत त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर गंभीर टीका केली होती. त्याच आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने चर्चाना उधाण आलं आहे.

दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतं आहे. तर दुसरीकडे काही दिवसापूर्वी अंधारे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेतली होती. तर आज त्या हाती भगवा झेंडा घेणार आहेत.

पत्रकारांशी बोलताना अडचणीच्या काळात शिवसेनेच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय मी घेतला असून यासाठी मी शिवसेनेत जाहीर प्रवेश करत असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगीतले आहे. उद्या दुपारी 12 वाजता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.