Share

Sushma andhare : मी शिवसेनेला बाळ दत्तक देते, जेवढे शिवसैनिक असतील.., धमक्या आल्यानंतर सुषमा अंधारेंची रोखठोक भूमिका

Sushma Andhare

Sushma andhare | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना धमक्या येत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वताच पत्रकारपरिषदेत या गोष्टीचा खुलासा केला आहे. याबाबत उद्धव ठाकरेंना कळवण्यात आले आहे असंही त्या म्हणाल्या.

सुरक्षा पुरवण्याबाबत पक्षाने पावलेही उचलली आहेत आणि पोलिसांनी त्यांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. सुषमा अंधारे यांच्यासोबत यावेळी शिवसेना नेते अरविंद सावंत आणि राजन विचारे उपस्थित होते. दसरा मेळाव्याला केलेल्या भाषणामुळे सुषमा अंधारे चर्चेत आल्या होत्या.

त्यानंतर आणखी एका सभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आणि भाजपवर सडकून टीका केली होती. त्यांच्या भाषणानंतर शिवसेनेच्या काही नेत्यांवर आणि सुषमा अंधारेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे सगळं झाल्यानंतर वाशीत महाप्रबोधन मेळावा पार पडल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी धमकीबाबत माहिती दिली. माहिती देताना त्या म्हणाल्या की, माझी पाच वर्षांची लेक आहे. मला कालपासून काही धोके जाणवत आहेत. काही इनपुट्स आले आहेत.

ज्यामध्ये मला असं समजलं की, बाहेर पडू नका. कोणी हल्ला करेन, धक्काबुक्की करेन. काल विद्यापीठात एलआयबीचे लोक माझ्याजवळ आले, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, लोहगाव पोलीस स्टेशनचे फोन येत होते. मला ते विचारत होते की, तुम्ही सुरक्षित आहात का? मला कळालं नाही असं का सुरू आहे.

मग माझ्या लक्षात आलं की, त्यांच्याकडे काही गोपनीय माहिती आहे, काहीतरी सुरू आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या की, मला शुट करतील का? वेगवेगळ्या प्रकरणात किंवा विविध पद्धतीने. तर मला काय चिंता आहे, माझ्याकडे एक पाच वर्षाचं बाळ आहे, म्हणून मी आज अगदी जाहीरपणे सांगितले की, मी शिवसेनेला माझं बाळ दत्तक देते. जेवढे शिवसैनिक आहेत ते मामा म्हणून मला सांभाळतील आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या बाळाचे कुटुंबप्रमुख असतील.

महत्वाच्या बातम्या
BJP : भाजपच्या मिशन बारामतीला मित्रपक्षानेच लावला सुरूंग, केली ‘ही’ मोठी घोषणा
Bachu Kadu : ‘मी आता मंत्री होईल नाहीतर…’; मंत्रिपद न मिळालेल्या नाराज बच्चू कडूंचं खळबळजनक विधान
chandrakant patil : मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी भाजपच्या चंद्रकांत पाटलांकडून घेतले कोट्यवधी रुपये? ऑडिओ क्लीप व्हायरल
Uddhav Thackeray : घाबरु नकोस, तुझ्या वडिलांसारखा लढ; फारुख अब्दुल्लांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now