Share

‘या’ कारणामुळे फडणवीसांनीच…; संदीप देशपांडेंवरील हल्ल्याचे फडणवीस कनेक्शन, गंभीर आरोपांनी खळबळ

Sushma Andhare

Sushma Andhare: मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. देशपांडे यांच्या हल्ल्याप्रकरणी खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याची देखील मागणी केली जात आहे. या प्रकरणात आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे.

अंधारे यांनी थेट नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहीर टीका केली आहे. बंडनेरा येथे शुक्रवारी सुषमा अंधारे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना सुषमा अंधारे यांनी संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी फडणवीसांकडे बोट दाखवत टीका केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, संदीप देशपांडे यांच्यावर खरच हल्ला झाला असेल तर, निषेधच आहे. सध्या कसबा पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवाची चर्चा सुरू आहे. देवेंद्रजींनी ही चर्चा दुसरीकडे वळवण्यासाठी तर हे केले नाही ना? हा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

तसेच, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला हा निंदनीय आहे. पण या निमित्ताने पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. गृहमंत्री फडणवीस कुमकुवत ठरत आहेत का असेच म्हणावे लागेल. असे म्हणत सुषमा अंधारे यांनी फडणीसांवर टीका केली.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी मुंबईतील दादर परिसरात मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर हल्ला करण्यात आला आहे. काही अज्ञात व्यक्तींनी देशपांडे यांच्यावर क्रिकेटची बॅट व आणि स्टंपने हल्ला केला. त्यामुळे त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे.

मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी चार जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशपांडे यांचा उजवा हात दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला असून त्यांच्या पायालाही दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या
आम्ही तर रामकृष्णाचे वंशज, धर्मांतरनंतरही आमचे रक्त हिंदुचेच; मुस्लिम आमदाराचे विधानसभेत जोरदार भाषण
आशेने लावला कांदा अन् झाला वांदा! १७ गोण्या कांदा विक्रीनंतर १ रुपये नफा; उत्पादन खर्चही निघेना  
सोन्याबाबत सर्वात मोठी बातमी! यापुढे ‘अस’ सोनं चालणार नाही; केंद्र सरकारचा नवा नियम

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now